Sanjay Raut Latest Marathi News, Gulab Patil News Saam Tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut : बाप बदलण्याची भाषा कोण करतंय? व्हिडीओ ट्विट करत राऊतांचा हल्लाबोल

Shivani Tichkule

मुंबई - सध्या राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतुन (Shivsena) बंड केल्यानंतर राज्यभरात शिवसेना आक्रमक झालेली पहायला मिळत आहेत. या दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) एखादं ट्वीट करत आपल्या विरोधकांवर टीका करण्याची संधी सोडत नाही. (Sanjay Raut Latest Marathi News)

हे देखील पाहा -

संजय राऊत रोज बंडखोर आमदारांवर टीका करताना दिसून येत आहेत. आज सुद्धा संजय राऊत यांनी एक खोचक ट्विट केलं आहे. एक व्हिडीओ ट्वीट संजय राऊतांनी बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भाषणाचा एक जुना हा व्हिडीओ ट्विट करत म्हटलं आहे की, बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा. श्रीमान केसरकर, थोडा संयम ठेवा. डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका. आपण यांना ओळखता ना? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

गुलाबराव पाटील यांनी व्हिडीओत काय म्हटलंय

या व्हिडीओत गुलाबराव पाटील म्हणत आहेत की, शिवसेनेत पुंगी वाजवणारे विजयराज शिंदे आमदार झाले. शिवसेनेत रिक्षा चालवणारे दिलीप भोळे आमदार झाले. पानटपरी चालवणारे गुलाबराव पाटील आज तुमच्यासमोर मंत्री म्हणून बोलत आहे. हे सोडा सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले. 'कतलिया कही साप बदल लेते है, पुण्य की आड में पाप बदल लेते है, मतलब के लिए कई लोग अपने बाप बदल लेते है', असं गुलाबराव पाटील या व्हिडीओमध्ये म्हणत असल्याचे दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT