चंद्रकांत पाटील, संजय राऊत
चंद्रकांत पाटील, संजय राऊत Saam Tv News
मुंबई/पुणे

चंद्रकांत पाटील नागालँडचे राज्यपाल? काय म्हणाले संजय राऊत

वैदेही काणेकर, सामटीव्ही मुंबई

मुंबई : भाजपचे BJP प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी आपणाला माजी मंत्री म्हणू नका, असे वक्तव्य केलं होतं. त्याचा समाचार शिवसेना Shivsena खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी घेतला आहे. माझ्या असे कानावर आले आहे की नागालँडचे राज्यपाल म्हणून त्यांना विचारणा केली आहे, म्हणून कदाचित ते म्हणाले असतील, जर नागालँडचे Nagaland राज्यपाल म्हणून ते जात असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा...असे म्हणत राऊत यांनी पाटील यांना चिमटा काढला आहे.

"चंद्रकांत दादा हे राजकीय विरोधक जरी असले तर ते आमच्या सर्वांचे चांगले मित्र आहेत, आमच्या त्यांना कायम सदिच्छा आहेत, काल ते म्हणाले मला माजी मंत्री म्हणू नका, ही माजी म्हणून घ्यायची वेदना मी समजू शकतो, पण मी त्यांना निरोप पाठवला आहे की पुढील पंचवीस वर्ष तुम्हाला माजी म्हणूनच राहावं लागेल, उद्धवजींच्या Uddhav Thackeray नेतृत्वाखाली आम्ही हे सरकार किमान पंचवीस वर्षे चालवु, त्यामुळे पंचवीस वर्ष मनाची तयारी ठेवा, ते जर स्वप्न पाहत असतील तर त्यांना बघू द्या, अजून तरी स्वप्नावर कोणताही टॅक्स लावलेला नाही,"असेही राऊत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या वाढदिवसानिमित्त राऊत यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. "नरेंद्र मोदी हे देशाचे मोठे नेते आहेत, अनेक वर्षापासून ते देशाचे नेतृत्व करत आहेत, त्यांच्या संघर्षाचा काळ आम्ही पाहिला आहे, मोदी यांच्या काळात देशाला राजकीय स्थैर्य लाभले आहे. भाजपा नेहमीच आघाड्या बनवून सत्तेत होते, मात्र मोदींच्या काळात एक हाती सत्ता बनवू शकले, ही मोदींच्या नेतृत्वाची आणि लोकप्रियतेची कमाल आहे, हे मान्य करायला हवं.नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा दुसरा नेता आज देशात दिसत नाही, हेही तितकंच खरं आहे, मोदी यांच्याबद्दल कितीही वाद असले तरी ते देशाचे पंतप्रधान आहेत, म्हणून आपण त्यांना शुभेच्छा द्यायला हव्यात, मी देखील त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा देतो,''

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News: महायुतीच्या प्रमुख नेत्यांची उद्या मुंबईत बैठक

Maharashtra Lok Sabha: राज्यात तिसऱ्या टप्प्यात 54,09 टक्के मतदान, कोल्हापुरात सर्वाधिक, तर बारामतीत सर्वात कमी मतदान

Lok Sabha Election : ४० वर्षांच्या महिलेच्या ओळखपत्रावर मतदान करण्यासाठी आली 8 वीतील मुलगी, बोगस मतदानाचा Video आला समोर

Pune PDCC Bank: मोठी बातमी! PDCC बँकेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Haryana Politics: हरियाणात भाजपला मोठा धक्का, 3 अपक्ष आमदारांनी सोडली साथ; सरकार अल्पमतात येणार?

SCROLL FOR NEXT