Maharashtra Political News Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : 'कॅबिनेटला देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाका'; ठाकरे सेनेचा सत्ताधाऱ्यांवर संताप, VIDEO

Maharashtra Political News : भारत-पाकिस्तान सामन्यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलयं.. त्यातच खासदार संजय राऊतांनी थेट कॅबिनेटला टार्गेट करत संताप व्यक्त केलाय..राऊत नेमकं काय म्हणाले? सत्ताधाऱ्यांनी राऊतांच्या विधानाला नेमकं कसं प्रत्युत्तर दिलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

आशिया कपचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान या संघांमध्ये खेळला जाणार आहे.मात्र त्याआधीच पुन्हा एकदा राजकारण तापलयं...भारत-पाकिस्तान सामन्याचे प्रक्षेपण पीव्हीआर सिनेमागृहात करण्यात येणार असल्यामुळे ठाकरेसेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय..हे कृत्य म्हणजे देशाच्या सैन्याचा अपमान आहे.. या संपूर्ण प्रकरणामुळे कॅबिनेटला देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकायला हवं, अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिलीय..

दुसरीकडे भारत-पाकिस्तान सामन्यावर केलेल्या टीकेमुळे सत्ताधाऱ्यांनीही राऊतांना घेरलयं..राऊतांचा DNA पाकिस्तानचा आहे का? , अशी टीका भाजपने केलीय.

दरम्यान, ठाकरेसेनेनं पीव्हीआरचे पडदे जाळण्याचा इशारा दिल्यानंतर पीव्हीआरकडूनही भारत-पाकिस्तान सामन्याचं स्क्रीनिंग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय... ऑपरेशन सिंदूरनंतर भारतानं पाकिस्तानसोबत मॅच खेळू नये, यासाठी विरोधकांनी रानं उठवलेलं होतं.

ठाकरे सेनेने 14 सप्टेंबरला भारत-पाक सामन्या विरोधात 'माझा देश माझं कुंकू' ही मोहीम राबवून आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध केला होता. ठाकरे सेनेच्या महिला आघाडीने पंतप्रधान मोदींना कुंकू पाठवलं होतं. आता क्रिकेटवरुन विरोधकांची सुरु असलेली फटकेबाजी सत्ताधारी कशी परतावतायेत ते पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दूध नाही तर विष पिताय! उकळताना दूध झालं अक्षरशः रबरासारखं

Ladki Bahin Yojana : दिवाळी झाली, भाऊबीजेलाही नाही; लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार? आली नवी अपडेट

Chandrashekhar Bawnkule: राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला म्हणणारे राष्ट्रद्रोही; बावनकुळे यांची खोचक टीका

Kalyan News: कल्याणमध्ये 4 धाडसी तरूणांमुळे मोठा अनर्थ टळला, ऐन दिवाळीत आलं होतं मोठं संकट

Maharashtra Live News Update: पुणे शहराच्या उपनगरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT