Sanjay Raut-Chandrashekhar Bavankule Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Political News : संजय राऊतांनी चंद्रशेखर बावनकुळेंना पुन्हा डिवचलं; मकाऊतील आणखी एक व्हिडीओ केला शेअर

Sanjay Raut-Chandrashekhar Bavankule : संजय राऊत यांनी एक ६ सेकंदांचा व्हिडीओ शेअर केला आहे. 'मकाऊ की रातें.. पिक्चर अभी बाकी है..'. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

प्रविण वाकचौरे

गिरीश कांबळे

Mumbai News :

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी मकाऊ येथील कॅसिनोमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यानंतर या फोटोत बावनकुळे हे जुगार खेळत असल्याचा दावा अनेकांनी केला होता. संजय राऊत यांचा हा दावा बावनकुळे यांनी फेटाळला होता. संजय राऊत आणि आज पुन्हा एक व्हिडीओ शेअर करत चंद्रशेखर बावनकुळे यांना डिवचलं आहे.

संजय राऊत यांनी एक ६ सेकंदांचा व्हिडीओ शेअर केला आहे. 'मकाऊ की रातें.. पिक्चर अभी बाकी है..', असं कॅप्शन संजय राऊत यांनी या पोस्टला दिलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.  (Latest Marathi News)

संजय राऊतांनी केलेल्या पोस्टनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं की, फोटोच्या आधारावर कोणाची प्रतिमा मलीन करता येत नाही. खरंतर मी मागील ३४ वर्षांपासून राजकीय, सामाजिक, सार्वजनिक जीवनात आहे. मी भाजपा-शिवसेना युतीचंही अनेक वर्ष काम केलं आहे. चार-चारदा आम्ही मतदारसंघात निवडून आलो आहोत. मोठ्याप्रमाणावर आम्ही संघर्ष करून, ३४ वर्षे काम करून आम्ही प्रतीमा तयार केली आहे. त्यामुळे जर कोणी असा प्रयत्न केलाही असेल, तर त्यांचा प्रयत्न त्यांना लखलाभ.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संजय राऊतांचं आधीचं ट्वीट

संजय राऊत यांनी याआधी एक फोटो शेअर करत, लिहिलं होतं की, महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत. फोटो zoom करुन पाहा. ते तेच आहेत ना? पिक्चर अभी बाकी है...

संजय राऊतांच्या आरोपांनंतर बावनकुळे यांनी एक फोटो शेअर करत स्पष्टीकरण दिलं होतं. 'मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे', असं बावनकुळे यांनी म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Politics: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात मोठा धक्का, बड्या महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Maharashtra Live News Update : मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Skipping Benefits: दररोज १५ मिनिटे दोरी उडी मारल्याने शरीराला मिळतील 'हे' फायदे

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत ठाण्यात शिंदेंचा राजीनामा, राजकारणात पडद्यामागं मोठी घडामोड|VIDEO

Maharashtra Politics: पुण्यात हातमिळवणी धुळ्यात घात; शरद पवार गटाला खिंडार; बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT