मुंबई : शिवसेना आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट यांच्यात आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलेल्या 12 आमदारांना पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरवावं अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यांकडे करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या १२ समर्थक आमदारांना पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवावं अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेच्या (Shivsena) वतीने विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. अशातच शिंदे गटाकडे आकडा फक्त कागदावरती आहे. ते सरकार बनवू शकत नाही, शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना पश्चाताप होईल. असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बोलतांना म्हटलं आहे. (Sanjay Raut Latest News)
आज बाळासाहेबावरच्या श्रद्धेची निष्ठेची कसोटी, आकडा हा चंचल असतो, ते मुंबईत आल्यावरच लागेल, शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना पश्चाताप होईल. असं देखील संजय राऊत यांनी ठणकावून सांगितल आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची आज सकाळी ९ वाजता हॉटेल रेडिसन एक महत्वाची बैठक होणार असून या बैटकीद्वारे ते पुढील रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. (Eknath Shinde News)
शिंदे गटाचे सरकार बनेल किंवा नाही हे माहिती नाही, शिवसेना एक महासागर आहे, तो कधी आटत नाही, आता ही कायदेशीर लढाई पुढे बघू काय होईल ते असं देखील संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलंय. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. तर शिवसेनेच्या आमदारांची संख्या मात्र कमी होत आहे.
आपल्याला 50 पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीनंतरच पुढील रणनिती ठरणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.