शिंदे गटाने लावलेले बॅनर ठाकरे समर्थकांनी फाडले; सेनेच्या २ गटांमध्ये तणावाचं वातावरण

एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीला दिलेल्या आव्हानामुळे आता शिंदे विरुद्ध ठाकरे असे दोन गट शिवसेनेत पडले आहेत.
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray News
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Newsभूषण अहिरे
Published On

धुळे : धुळ्यात मंत्री एकनाथ शिंदे समर्थकांनी लावलेला बॅनर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समर्थकांनी फाडल्याची घटना घडली आहे. या बॅनरबाजीमुळे धुळ्यात शिवसेनेच्या दोन गटांमध्ये तणावाचं वातावरण तयार झालं आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मातोश्रीला दिलेल्या आव्हानामुळे आता शिंदे विरुद्ध ठाकरे असे दोन गट शिवसेनेत पडले आहेत.

या दोन्ही गटांकडून आपपाल्या नेत्यांचे समर्थन करण्यात येत आहे. यासाठी ते सोशल मीडियाचा वापर करत आहेत. तसंच आपापल्या कार्यक्षेत्रात नेत्यांचे बॅनर लावत आहेत. काल ठाण्यासह (Thane) नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली होती.

शिंदे यांच्या समर्थकांकडून लावण्यात आलेल्या बॅनरवरुन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Uddhav Thackeray and Aditya Thackeray) यांच्या फोटो लावले नव्हते, मात्र बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो मात्र या बॅनरवर होते. अशाच प्रकारचे बॅनर धुळ्यात देखील शिंदे समर्थकांनी लावले असता ते ठाकरे समर्थकांनी फाडल्याची घटना समोर आली आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान, मंत्री एकनाथ शिंदे समर्थकांनी लावलेले धुळ्यातील सर्व बॅनर फाडत उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ केली घोषणाबाजी देखील केली आहे. मात्र या घटनेमुळे धुळ्यातील (Dhule) शिंदे समर्थक आक्रमक झाले असून त्याचे पडसाद आता धुळ्यात पहायला मिळत आहेत. मंत्री एकनाथ शिंदे यांचा बॅनर फाडतानाचा व्हिडिओ साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

आपला गट हाच शिवसेना विधिमंडळ पक्ष असल्याचा दावा शिंदेंकडून करण्यात आल्यामुळे आता सेनेत फूट पडली असून उद्धव ठाकरे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मात्र, शिंदे यांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या आमदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे जवळपास ५० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा ते करत आहेत. त्यामुळे आता खरी शिवसेना कोणती आणि समर्थन कोणाचं करयाचं असा प्रश्न सामान्य शिवसैनिकांसमोर उपस्थित झाला आहे.

दरम्यान, मुंबईत देखील एका शाखाप्रमुखाने बंडखोर आमदाराचा निषेध करणाऱ्या करणारी फेसबुक पोस्ट टाकली म्हणून त्या शाखाप्रमुखाला धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे दोन्ही गट एकमेकांविरोधात आक्रमक झाल्याचं आता पाहायला मिळतं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com