sanjay raut
sanjay raut  saam tv
मुंबई/पुणे

शिवरायांचा अपमान करणारं वक्तव्य ही भाजपची अधिकृत भूमिका आहे का?; संजय राऊत यांचा संतप्त सवाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी औरंगाबादमध्ये (Aurangabad) बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्त्यव्य केलं होत. याने महाराष्ट्रातील लाखो शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यावर आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यापालांवर हल्लाबोल केला आहे.

प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, शिवाजी महाराजांबदल राज्यपालांनी केलेलं वक्तव्य दळभद्री आहे. त्यामुळे  महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा एकदा दुखावला गेला आहे. भाजपचे प्रवक्ते शिवाजी महाराजांबदल (Shivaji Maharaj)अपमान करणारे वक्तव्य करतात ही भाजपची अधिकृत भूमिका आहे का? असा थेट सवाल संजय राऊतांनी यावेळी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा पाचवेळा औरंगजेबाची माफी मागितली असे मोठं वक्तव्य केलं. ही भाजपाची अधिकृत भूमिका आहे का? की वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचवेळी कधी माफी मागितली. हे आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात जाहीर केलं पाहिजे. कारण ते आता भाजपाचे सहयोगी आहेत, ते मुख्यमंत्री आहेत.

वीर सावरकरांबाबत आपण रस्त्यावर उतरलात स्वागत आहे. जोडे मारले त्याचे देखील स्वागत आहेत. आता हे जोडे तुम्ही कोणाला मारणार आहात? भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्याला मारणार आहात की राज्यपालांना मारणार आहात? ज्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान असणाऱ्या शिवाजी महाराजांचा अशाप्रकारे घोर अपमान केला.

सतत स्वाभिमानाची भाषा बोलणारे शिंदे आता गप्प का? शिवरायांचा अपमान तुम्ही सहन कसा काय करू शकता? असा संतप्त सवाल संजय राऊतांनी यावेळी उपस्थित केला आहे. त्याचबोरबर भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपालपदावरून हटवा. नाहीतर जोडे काय असतात? आणि ते कसे मारले जातात? हे शिवसेना दाखवल्याशिवाय राहणार नाही, असंही राऊत म्हणावलेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : आम्ही कायम भांडत रहावं आणि...; आदित्य ठाकरेंच्या आरोंपांवर दीपक केसरकरांचा पलटवार

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT