sanjay raut Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईवर शिवसेनेचा झेंडा राहणार: संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत यांची काल ईडी कार्यालयात ९ तास चौकशी केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची काल ईडीने ९ तास चौकशी केली. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने राऊत यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. यावर आज संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली. 'मी ईडीला घाबरुन गुवाहाटीला गेलो नाही. मा घाबरणाऱ्यातील नाही, असा टोला भाजपला संजय राऊत यांनी लगावला.

भाजपने एकनाथ शिंदेंना मुंबईवर भाजपचा झेंडा लावण्यासाठी मुख्यमंत्री केले आहे, पण मुंबईवर शिवसेनेचा झेंडा राहणार आहे. भाजपचा हा डाव यशस्वी होणार आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

राज्यसभेवर माझा पराभव झाला असता तरीही मी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिलो असतो, मी फुटणाऱ्यातील बुडबुडा नाही. जिथे ठाकरे आहेत तिथे शिवसेना आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच आहे, असंही राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री पदावर बोलताना म्हणाले, मला उप म्हणायला जड जात आहे, पण भाजपमध्ये शिस्त आणि आदेश पाळला जातो याचे कौतुक करायला पाहिजे, असंही राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

शिवसेनेचे खासदार फुटणार असल्याच्या चर्चांवर राऊत म्हणाले, अस काही होणार नाही, कोणताही खासदार फुटणार नाही. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. मुंबईवर शिवसेनेचाच झेंडा राहणार आहे, असंही राऊत म्हणाले.

नेत्यांनी शिवसेना फोडली तरही कार्यकर्ते शिवसेनेत आहेत, तिथे ठाकरे आहेत तिथे शिवसेना आहे. त्यामुळे शिवसेना ही ठाकरेंची आहेत. एकनाथ शिंदे यांच्यावरील कारवाईवर बोलताना राऊत म्हणाले, ही कारवाई पक्षाची आहे, उद्धव ठाकरे हे पक्ष प्रमुख आहेत. पक्षात काही चुकीच केले तर कारवाई केली जात, असंही राऊत(Sanjay Raut) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early signs of stroke: शरीरात ही ५ लक्षणं दिसली तर समजा स्ट्रोक येऊ शकतो; संकेत ओळखून करा उपाय

Election: निवडणूक आयोगाकडून उमेदवारांना मोठा दिलासा, निवडणुकीच्या प्रचारासाठी मुदत वाढवली

Maharashtra Live News Update: संजय राऊतांची तोफ पुन्हा धडाडणार, सोमवारी साधणार संवाद

Adv Suraj More : कोकणातल्या लेकाची अभिमानस्पद कामगिरी! सूरज मोरेची जिल्हा न्यायाधीशपदी निवड

Dry Skin Remedies: हिवाळ्यात कोरड्या त्वचेला करा बाय बाय, हे ५ घरगुती ठरतील बेस्ट

SCROLL FOR NEXT