मंत्रिपदाबाबत बच्चू कडूंचे मोठे विधान, म्हणाले...

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले.
Bacchu kadu
Bacchu kadu Saam Tv
Published On

मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता मंत्रिमंडळात कोण मंत्री असणार यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. प्रहारचे बच्चू कडू यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

'काही वृत्तवाहिन्यांनी माझ्याबद्दल जे मंत्रिपद आणि खाते वाटपच्या अनुषंगाने जी बातमी दाखवली आहे ती चुकीची असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मी या संदर्भात कुठल्याही वृत्तवाहिनीवर प्रतिक्रिया दिली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तरीही कुणी याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन बच्चू कडू यांनी केले.

Bacchu kadu
केंद्रीय नेतृत्वाने सांगितल्यानेच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं : देवेंद्र फडणवीस

गेल्या काही दिवसापासून राज्यात राजकीय नाट्य सुरू आहे. आता नवे सरकार स्थापन झाले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची तर उपमुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. आता बंड केलेल्या आमदारांना मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Bacchu kadu
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! शिवसेना पक्षप्रमुखांनी पदावरून हटवले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का!

शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या अडचणीत भर पडली आहे. पक्षाने थेट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेनेच्या नेते पदावरून हकालपट्टी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhv Thackeray) यांनी ही हकालपट्टीची कारवाई केली आहे. त्यामुळे हकालपट्टीची कारवाई केल्याने त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. (Eknath Shinde News In Marathi )

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेना पक्षाचे चाळीस हून अधिक आमदार फोडले. त्यानंतर सुरत गाठले. सूरतनंतर गुवाहाटी येथे मुक्काम ठोकला. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही हकालपट्टीची कारवाई केली आहे. पक्षाने एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाचे सदस्यही नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत त्यांच्यावर कारवाई केली आहे. 'तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहात आणि स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्वही सोडले आहे.त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझ्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून मी तुम्हाला पक्ष संघटनेतील शिवसेना नेते पदावरून दूर करत आहे', असे उद्धव ठाकरेंनी पत्रात लिहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com