Sanjay Raut Shivsena Latest News
Sanjay Raut Shivsena Latest News ANI
मुंबई/पुणे

Sanjay Raut: 'मरेन पण...'; ईडीच्या धाडीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी आज सकाळी ईडीने (ED) धाड टाकली आहे. ईडीचे पथक दाखल झाले आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे. ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच राऊत यांच्या घरी पोहोचले आहेत. यावर आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पहिली प्रतिक्रिया ट्विट करुन दिली आहे. (Sanjay Raut Latest News)

कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन. खोटी कारवाई. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही जय महाराष्ट्र., अस ट्विट खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे.

मोठी बातमी! संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचे (ED)पथक दाखल झाले आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे. ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच राऊत यांच्या घरी पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक आहे. संजय राऊत यांना गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीने समन्स पाठवले होते. (Sanjay Raut Latest News)

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भांडूपमधील मैत्री या निवासस्थानी ईडीचे पथक दाखल झाले आहे. या आधीही पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. त्यांना अनेकवेळा समन्स बजावण्यात आले होते. मात्र त्यांनी चौकशीसाठी सहकार्य न केल्याने ईडीचे पथक आता त्यांच्या घरी दाखल झाले असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ईडीने समन्स पाठवले होते. पण राऊत यांनी अधिवेशनाचे कारण देत पुढची तारीख मागितली होती. आज सकाळी संजय राऊतांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली आहे. राऊत यांची अनेक प्रकरणांमध्ये त्यांची आज चौकशी होण्याची शक्यता आहे. ईडीने याअगोदर दोनवेळा संजय राऊत यांना ईडीचे समन्स बजावण्यात आले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon News : शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

Weight Loss Drinks : उन्हाळ्यात सकाळी उठल्याबरोबर 'हे' पेय प्या; होईल ७ दिवसांत चरबी कमी

Kalyan Constituency : कल्याणमध्ये शेवटच्या दिवशी ४० उमेदवारांचे अर्ज, अभिजीत बिचुकलेही मैदानात; सगळेच काहीसे बिचकले!

Today's Marathi News Live : अधिकृत उमेदवार म्हणून मी अर्ज भरलाय , माघार घेणार नाही; वैशाली दरेकर यांचा निर्धार

Google Audio Emoji: फोनवर बोलणं होईल आणखी मजेशीर, गुगलने आणलंय नवीन ऑडिओ इमोजी फीचर; कसा करायचा वापर?

SCROLL FOR NEXT