Sanjay Raut First Reaction On Sharad Pawar Meets CM Eknath Shinde Maharashtra Politics Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut Reaction: शरद पवार, CM शिंदेंच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “शिंदेंचं सिंहासन…”

Maharashtra Political News: शरद पवार, CM शिंदेंच्या भेटीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या भेटीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Satish Daud

Maharashtra Political News: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची भेट घेतली. वर्षा बंगल्यावर घेतलेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास ३५ मिनिटे चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेले, त्यामुळे या भेटीबाबतचा सस्पेन्स वाढला असून राजकीय वर्तुळात उलट सूलट चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या भेटीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Breaking Marathi News)

पवार,शिंदेंच्या भेटीवर काय म्हणाले राऊत?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नेहमीप्रमाणे मुंबईत आज माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरही भाष्य केलं. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राचं राजकारण काही ढवळून गेलेलं नाही, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचं सिंहासन लवकरच हललणार आहे, असा दावाही राऊतांनी केला आहे.

शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची घेतलेली भेट ही फक्त एक निमंत्रण देण्याची औपचारिक भेट होती. मराठा मंदीर या राज्यातील एक महत्वाची संस्था आहे. त्या संस्थेच्या सोहळ्याचं आमंत्रण देण्यासाठी शरद पवार एकनाथ शिंदेंना भेटायला गेले असतील, अशी आमची माहिती आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

"मविआच्या जागावाटप सुरळीतपणे पार पडेल"

संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावरही भाष्य केलं आहे. लोकसभा आणि विधानसभेसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप अत्यंत सुरळीतपणे पार पडेल. कोणालाही चिंता वाटायचं कारण नाही. माझं स्पष्ट मत आहे, लोकसभेचे जागावाटप व्यवस्थित बसून चर्चा होईल, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे. (Maharashtra Political News)

पुढे बोलताना राऊत म्हणाले, "प्रत्येक जागेचा उहापोह केला जाईल. ही जागा कोण जिंकू शकेल, कशाप्रकारे जिंकू शकेल, एकमेकांना कशाप्रकार सहकार्य केलं पाहिजे, त्यासंदर्भात चर्चा करू. त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. विधानसभेचं जागावाटपही त्याच पद्धतीने होईल. आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद होणार नाहीत. महाविकास आघाडी ज्याला आम्ही वज्रमुठ म्हणतो ते कायम राहिल".

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT