Sanjay Raut  saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut| संजय राऊतांना जामीन मिळणार? सुनिल राऊत थेट दिल्लीत पोहोचले

आमदार सुनिल राऊत दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यावरुन आता राजकीय चर्चेंना उधाण आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : गेल्या काही दिवसापासून शिवसेनेचे (ShivSena) नेते खासदार संजय राऊत पत्राचाळ प्रकरणी आर्थररोड जेलमध्ये आहेत. त्यांना अजुनही न्यायालयाने जामीन मजूर केलेला नाही. या पार्श्वभूमिवर आज आमदार सुनिल राऊत दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यावरुन आता राजकीय चर्चेंना उधाण आले आहे.

गेल्या एक महिन्यापासून ईडीकडून संजय राऊत (Sanjay Raut) यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान त्यांना अजुनही जामीन मंजूर झाला नसल्याने त्यांच्या जामीनासाठी भाऊ सुनिल राऊत (Sunil Raut) आता अॅक्शन मोडवर आले असल्याचे बोलले जात आहे.

तर दुसरीकडे काल आमदार सुनिल राऊत यांनी काल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. काल उद्धव ठाकरे यांची भेट आणि आज आमदार राऊत यांचा दिल्ली दौरा यावरुन आता चर्चांना उधाण आले आहे. यावर आज आमदार सुनिल राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे घर दिल्लीमध्ये आहे, त्याबाबतची परिस्थिती पाहण्यासाठी मी दिल्लीत आलो आहे. मी कुणाचीही राजकीय भेट घेतलेली नाही, कुठल्याही वकिलांशी मी चर्चा केलेली नाही. काल मी मातोश्रीवर गेलो होतो. उद्धव ठाकरे हे माझे कुटुंब प्रमुख आहेत, त्यांना मी कायम भेटत असतो. संजय राऊत यांच्या जामीनाबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार नाही. देशातला कुठलाही नामवंत वकील सांगेल की, संजय राऊत यांच्यावरच्या आरोपामध्ये काही तथ्य नाही, अशी प्रतिक्रिया आमदार सुनील राऊत यांनी दिली.

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या निवासस्थानी ईडीने 31 जुलै 2022 रोजी धाड टाकली. तब्बल साडे नऊ तास चौकशी करण्यात आली. यानंतर ईडीच्या कार्यालयात सात तासांहून अधिक काळ संजय राऊत यांची चौकशी झाली. दुसऱ्या दिवशी ईडीने संजय राऊत यांना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Noida Building Fire: ५ मजली इमारतीला भीषण आग, २ जणांचा मृत्यू; स्कूटी चार्ज करताना झालेल्या ब्लास्टमुळे घडली दुर्घटना

मोठी बातमी! माजी खासदार विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: संत सोपान काकांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा आज पार पडला

इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून तुफान चर्चा; नितीन गडकरींची बदनामी केल्याप्रकरणी ४ प्रसिद्ध एन्फ्ल्यूएन्सर कोण? कोणावर गुन्हा दाखल

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ₹१५०० जमा, जूनच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला आले का? लगेच अकाऊंट तपासा

SCROLL FOR NEXT