Sanjay Raut Amit Shah Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: ठाकरेंचीच शिवसेना असली, खोटे गोटे तुमचा कपाळमोक्ष करतील; संजय राऊतांचं अमित शहांना उत्तर

Satish Daud

Sanjay Raut vs Amit Shah

उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांचा पक्ष आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष नकली असून ते महाराष्ट्राचं काय हित करणार, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नांदेड येथील जाहीर सभेतून केली. उबाठा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हे पक्ष अर्धे होते आता दोघांनी मिळून काँग्रेस पक्षाला अर्ध केलं, असा टोलाही अमित शहा यांनी हाणला. दरम्यान, अमित शहा यांच्या या टीकेचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी हेच खरे पक्ष आहेत. बाकी अमित शहा यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना जे डुप्लिकेट पक्ष दिले आहेत, त्यांचा निकाल जनता लावल्याशिवाय राहणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत बोलत होते.

अमित शहा यांनी जे विधान केलंय ते आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. असली कोण आणि नकली कोण? हे अमित शहा (Amit Shah) ठरवू शकत नाही, असंही संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे जर नकली शिवसेनेचे प्रमुख आहेत, तर २०१९ साली तुम्ही त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासमोर नाक रगडण्यासाठी मातोश्रीवर का आला होता? असा सवालही संजय राऊत यांनी अमित शहांना विचारला आहे.

आता तुम्ही शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे खोटे गोटे गळ्यात अडकून फिरत आहात, हेच गोटे तुमचा कपाळमोक्ष केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमित शहा यांना दिला आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या डुप्लिकेट पक्षाचा निकाल जनताच लावेल, असंही राऊतांनी ठणकावून सांगितलं आहे.

दरम्यान,पंतप्रधान मोदी यांनी संसद ताब्यात घ्यायला हवी, असं विधान शिवसेना शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तीकर यांनी महायुतीच्या सभेतून केलं होतं. या विधानाचा देखील संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला.मोदींना संसद ताब्यात घेता येणार नाही हा रशिया नाही इथे पूतीनशाही चालणार नाही. नरेंद्र मोदी यांना नक्कीच गैरमार्गने संसद ताब्यात घ्यायची आहे, पण या देशातील जनता ते होऊ देणार नाही, असंही राऊत म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

SCROLL FOR NEXT