Uddhav Thackeray: पालघरमध्ये आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; अमित शहांच्या 'त्या' टीकेचा समाचार घेणार?

Palghar Lok Sabha 2024: शिवसेना पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच पालघर जिल्ह्याच्या दौरा करून सभा घेणार आहेत. त्यामुळे आजच्या सभेत ते नेमकं काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.
Uddhav Thackeray on Amit Shah
Uddhav Thackeray on Amit ShahSaam Tv
Published On

Uddhav Thackeray Palghar Sabha

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून राजकीय नेत्यांनी प्रचारसभांचा धडाकाच लावला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज शुक्रवार पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे जंगी सभा घेणार आहेत. शिवसेना पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच पालघर जिल्ह्याच्या दौरा करून सभा घेणार आहेत. त्यामुळे आजच्या सभेत ते नेमकं काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

Uddhav Thackeray on Amit Shah
Madha Lok Sabha: माढ्यात भाजपला मोठा धक्का, धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला राजीनामा

पालघर लोकसभा मतदारसंघ (Lok Sabha Election 2024) हा सध्या शिंदे गटाच्या ताब्यात असून येथे राजेंद्र गावित हे विद्यमान खासदार आहेत. महायुतीने यंदाच्या निवडणुकीसाठी पालघरमध्ये आपला उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. मात्र, राजेंद्र गावित यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोठी रणनिती आखली आहे.

ठाकरे गटाने पालघरमधून भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या प्रचारासाठीच उद्धव ठाकरे आज जंगी सभा घेणार आहेत. सायंकाळी ४ वाजता बोईसरच्या आंबटगोड मैदानावर उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. या सभेला महाविकास आघाडीचे काही दिग्गज नेते देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी बोईसर येथे शुक्रवारी पहाटेपासूनच शिवसैनिकांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या आजच्या सभेला जवळपास २० ते २५ हजार शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याची माहिती ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

अगदी दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी महाराष्ट्रात जंगी सभा घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा भडीमार केला होता. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष हे आधीच अर्धे होते, आता या दोघांनी मिळून काँग्रेस पक्षाला अर्ध केलं आहे. तीन तिघडा काम बिघडा अशी परिस्थिती या पक्षांवर आली आहे, अशी टीका अमित शहा यांनी नांदेड येथील सभेतून केली होती.

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही नकली पक्ष आहेत. हे तीन नकली पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्राचं हित काय करणार अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस पक्षावर निशाणा साधला होता. या टीकेला ठाकरे आजच्या सभेतून सडेतोड उत्तर देण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray on Amit Shah
Pune News: डीएसके यांच्या मालमत्तेबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या; उच्च न्यायालयाचे विशेष न्यायालयाला आदेश

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com