Sanjay Raut News Saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut News: पांडुरंग खोक्यांकडे आणि तेलंगणाच्या बोक्यांकडेही पाहतोय; संजय राऊतांचा हल्लाबोल

'पांडुरंग खोक्यांकडे आणि तेलंगणाच्या बोक्यांकडेही पाहतोय, संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे.

जयश्री मोरे

Sanjay Raut News: भारत राष्ट्रीय समितीचे चंद्रशेखर राव यांचे महाराष्ट्र दौरे वाढले आहेत. राज्यातील काही नेत्यांनी भारत राष्ट्रीय समितीत प्रवेश करून चंद्रशेखर राव यांचे हात मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात भारत राष्ट्रीय समिती पक्षाच्या एन्ट्रीची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भारत राष्ट्रीय समितीच्या राज्यातील शिरकावावर संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे. 'पांडुरंग खोक्यांकडे आणि तेलंगणाच्या बोक्यांकडेही पाहतोय, संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)

संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत म्हणाले, 'चंद्रशेखर बावनकुळे यांना एवढं महत्त्व देण्याला काही अर्थ नाही. त्यांच्या हातात काही नाही, सर्व काही दिल्लीवरून होत आहे. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची वकिली चंद्रशेखर बावनकुळे कधीपासून करायला लागले आहे, त्यांनी स्वतःच्या पक्षाकडे बघावं. भाजपने कितीतरी टीम बनवलेल्या आहेत. आता नवीन टीम बनवली आहे. 2019 ला एमआयएम ला बनवली होती, तर कधी मनसे बनवली होती. रात गेली बात गेली. आता चंद्रशेखर राव यांना बोलावलं आहे. मात्र, महाविकास आघाडी लढेल आणि आघाडी जिंकेल'.

राऊत पुढे म्हणाले, 'मी दैनिक 'सामना'मध्ये माझी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. केसीआर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हित पाहण्यासाठी इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनी येथे येण्याची गरज नाही. तुमचा पक्ष राष्ट्रीय स्तरावर काम करत नाही, तसेच तुमच्या पक्षाकडे राष्ट्रीय धोरण नाही. तुमचा तेलंगणामधील पक्ष आहे. आंध्र प्रदेशमधील देखील नाही. पण तुम्ही आता महाराष्ट्रात घुसत आहेत. अर्थात भारतीय जनता पक्षाने तुम्हाला सुपारी दिली आहे'.

'लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला त्रास द्यायचा आहे, यासाठी चंद्रशेखर राव यांचे प्रयोजन करण्यात आले आहे. केसीआर यांच्या राज्यात आतापर्यंत ६५ सरपंचांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या राज्यात भ्रष्टाचार सर्वात मोठी प्रकरण आहेत. त्यांच्या मुलीवरती भ्रष्टाचाराचे प्रकरण आरोप आहेत. त्याची चौकशी करत आहे, या सर्वांचा परिणाम म्हणून ते भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मदत करण्यासाठी घुसले आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.

'विठोबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. विठोबा सगळीकडे पाहत आहेत. पांडुरंग आमचे दैवत आहेत. पांडुरंग डोळे उघडे ठेवून प्रत्येक घडामोडीकडे पाहत आहेत, तो खोक्यांकडे देखील पाहत आहे. तो तेलंगणाच्या बोक्यांकडे देखील पाहत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपुरात चंद्रभागाने इशारा पातळी गाठली; नदीकाठी पूरस्थिती

Manache Shlok : कुटुंब, प्रेम अन् मैत्रीची रंगतदार गोष्ट; 'मना’चे श्लोक'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, पाहा VIDEO

Gautam Gambhir: 1 रूपयात पोटभर जेवण! टीम इंडियाच्या गुरूचं कौतुक करावं तितकं कमी, Video

Marathwada : १५०० कोटींपेक्षा अधिक निधी, पण शेतकऱ्यांना KYC नंतरच मदत, पुरानंतर पुराव्याचं संकट? | VIDEO

Marathi Actor : मराठी अभिनेत्यानं परदेशी गर्लफ्रेंडसह गुपचुप केलं लग्न, पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी

SCROLL FOR NEXT