Devendra Fadnavis Vs Eknath Khadse : फडणवीस लहान मुलांच्या भांडणासारख्या बालिश टीका करतायेत; एकनाथ खडसेंची बोचरी टीका

Political News : मी जमीनच खरेदी केलेली नाही तर जमिनीत तोंड काळ करण्याचा प्रश्नच नाही, असंही खडसे यांनी म्हटलं.
Eknath Khadse-Devendra Fadnavis
Eknath Khadse-Devendra FadnavisSaam TV

Buldhana News : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे. अलीकडच्या काळात फडणवीस हे फ्रशट्रेशनमध्ये असल्याचे दिसत आहे. इतक्या बालिश टीका ते करायला लागले की, लहान मुलांचं जसं भांडण असतं तसं ते वागत आहेत. मुख्यमंत्री लेव्हलचा माणूस, मुख्यमंत्री राहिलेला माणूस, त्याने काय शब्द वापरावे , काय बोलावं हे कळलं पाहिजे असी टीका खडसे यांनी केली.

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने...

तुमचे सांगाडे बाहेर काढेल तर कधी कुणाला काय म्हणतात . मला म्हणतात जमिनीमध्ये तुम्ही तोंड काळ केलं. परंतु जमिनीचा व्यवहार हा कायदेशीर आहे. माझा त्याच्याशी काही संबंध नाही. माझा तर आरोप नेहमी आहे की , मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी असल्याने यांनी मला अनेक घोटाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. हे अख्या जगाला माहिती आहे. कोणताही गैरव्यवहार मी केलेला नाही. मी जमीनच खरेदी केलेली नाही तर जमिनीत तोंड काळ करण्याचा प्रश्नच नाही, असंही खडसे यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

Eknath Khadse-Devendra Fadnavis
Raj Thackeray News : पुण्यातील तरुणीवरील जीवघेण्या हल्ल्यानंतर राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना, प्रशासनाचेही कान टोचले

भ्रष्टाचारी तुमच्या मंत्रिमंडळात

ज्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोप तुम्ही आयुष्यभर केले ते आज मंत्रिमंडळात तुमच्या शेजारी बसतात . अशा लोकांना घेऊन तुमचं मंत्रिमंडळ आहे. त्यांच्या विरोधात तुम्ही का बोलत नाही. काळं तोंड केलं , हिरवं तोंड केलं यापेक्षा कापसाला किती भाव दिला हे मी विचारत असतो. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याऐवजी याचं तोंड काळ केलं, त्याचं तोंड काळ केलं हे बोलण्यात काय अर्थ आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. (Political News)

Eknath Khadse-Devendra Fadnavis
Thackeray Group Morcha on BMC : ठाकरे गटाने सुचवलेल्या दुसऱ्या मार्गाला तरी परवानगी मिळणार का? गृहविभाग उद्यापर्यंत निर्णय घेणार

घोटाळा झाला तर चौकशी का नाही केली

पतंप्रधन नरेंद्र मोदींनी ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला, तो २०१२ सालचा होता. २०१४ साली मोदीजींचं सरकार आलं. जर तुम्हाला असं वाटतं की घोटाळा आहेत तर त्या काळात चौकशी का केली नाही? मला माहिती आहे त्यात कुठलाही घोटाळा नाही. तेवढं तर बजेटच नव्हतं, तर घोटाळा होण्याचा काय संबंध? असा सवालही एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com