Maharashtra Election 2024 Sanjay Raut Saam Digital
मुंबई/पुणे

Sanjay Raut : मविआत वाद नाही, साडेतीन शहाण्यांना आव्हान देण्यासाठी आजचा मुहूर्त; संजय राऊत यांचा घणाघात

Sanjay Raut on maha vikas aghadi News : आम्ही राज्यातील राजकारणातील साडेतीन शहाण्यांना आव्हान देण्यासाठी आजचा पत्रकार परिषदेचा मुहूर्त आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. ते मुंबईत बोलत होते.

Vishal Gangurde

मयूर राणे, मुंबई

Sanjay Raut News:

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेण्याचे ठरवले आहे. या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निवडणुकीचा सर्व फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये आता कोणताही वाद नाही. आम्ही राज्यातील राजकारणातील साडेतीन शहाण्यांना आव्हान देण्यासाठी आजचा पत्रकार परिषदेचा मुहूर्त आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. ते मुंबईत बोलत होते.

संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. संजय राऊत म्हणाले, 'आज हिंदू नववर्ष आहे. त्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे. महाराष्ट्रात आजच्या दिवशी महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा देतो. महाराष्ट्रात निवडणुकांचे वातावरण आहे. आम्ही आजच्या शुभ मुहूर्तावर महाविकास आघाडी एकजुटीचं प्रदर्शन करेल. आज शिवालयमध्ये अकरा वाजता संयुक्त पत्रकार परिषद आहे. या परिषदेला शरद पवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्यासह सर्व उपस्थित राहतील. तसेच समाजवादी पार्टी, डावे पक्षही तिथे उपस्थित राहतील.

'महाराष्टात एकजूट कायम राहील. आम्ही ३५ पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा जिंकू . ही बाब जाहीर करायला आजच्या शुभ दिनी जाहीर करायला मागे पुढे पाहणार नाही. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. खरंतर, महाराष्ट्राच्या राजकारणात साडेतीन शहाणे आपल्याला दिसत आहेत. त्या साडेतीन शहाण्यांना आव्हान देण्यासाठी आजचा मुहूर्त निवडला आहे,असे राऊत म्हणाले.

जागावाटपावर संजय राऊत काय म्हणाले?

जागावाटपाच्या तिढ्यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, 'आपण अनेक वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने काम करतो. एकत्र येतो. प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते काम करत असतात'. सांगली किंवा भिंवडीविषयी ते म्हणाले, 'विश्वजीत कदम आणि विशाल पाटील या दोन्ही सांगलीकर नेत्यांच्या भावनांशी मी सहमत आहे. एक राजकीय कार्यकर्ता म्हणून त्याप्रमाणात भिवंडी देखील राजकीय कार्यकर्त्यांशी सहमत आहे'.

' आम्ही रामटेक, अमरावती, कोल्हापूर येथील आमच्या जागा काँग्रेसला सोडल्या. तेथील शिवसैनिकांच्या ज्या भावना आहेत. तेथील शिवसैनिकांच्या भावनांशी देखील सहमत आहे. आपल्याला शेवटी या देशात हुकूमशाही विरुद्ध लढताना काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात. काही गोष्टीचा त्याग करावा लागतो, असे राऊत पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

SCROLL FOR NEXT