sanjay raut and eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut News: दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जा, संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा

राज्यातून बाहेर गेलेली गुंतवणूक तुम्ही परत आणली तर तुमच्या दावोसच्या जाण्याला अर्थ आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वित्झर्लंडमधील दावोससाठी रवाना झाले आहेत. दावोस येथे मुख्यंत्री वर्ल्ड ईकोनिमिक फोरमने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होतील. २० उद्योगांसोबत १ लाख ४० हजार कोटींचे सामंजस्य करार करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.

महाराष्ट्रातील लाखो कोटींची गुंतवणूक तुमच्या नाकासमोरुन गुजरात आणि इतर राज्यामध्ये गेली. मिहानमधून, वेदांत फॅाक्सकॅान असे दोन लाख कोटीचे उद्योग बाहेर नेले. राज्यातून बाहेर गेलेली गुंतवणूक तुम्ही परत आणली तर तुमच्या दाओसला जाण्याला काही अर्थ आहे.

आतापर्यंत दावोसला जाऊन किती करार झाले आणि किती गुंतवणूक इथे आली याबाबत कुणीही स्पष्ट सांगणार नाही. त्यामुळे दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जा, अशी टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी मुंबईत येणार आहे. विविधा विकासकामांचे उद्घाटन त्यांच्याहस्ते होणार आहे. यावरुनही संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

मुंबईतील बहुतेक सर्व प्रकल्प हे महाविकास आघाडीच्या काळात झाले किंवा मुंबई महापालिकेत शिवसेना सत्तेत असताना हे प्रकल्प झाले आहेत. त्याच प्रकल्पांसाठी आपलं सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलवत आहे.

पंतप्रधानांना चुकीची माहिती देऊन पुन्हा पुन्हा त्याचं श्रेय घेण्याचा हा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. पंतप्रधान यांच्या प्रतिष्ठेला डाग लावण्याचा हा प्रकार आहे. मात्र भाजपची हीच भूमिक असेल तर काही करु शकत नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dussehra auspicious yog: विजयादशमीचा शुभ दिवस! या ४ राशींवर ‘शुभ योगांचा’ वर्षाव, आयुष्यात येणार मोठा बदल

Manoj Jarange : मनोज जरांगे पुन्हा फडणवीस सरकारला घेरणार, दसरा मेळाव्यात करणार मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana: ओटीपी येतोय, पण केवायसी प्रक्रिया पूर्ण होतच नाही, लाडक्या बहि‍णींपुढे नवे संकट, काय करावे?

Maharashtra Dasara Melava Live Update : देशाला आत्मनिर्भर होण्याची गरज - मोहन भागवत

IND vs WI: 347 दिवसांनंतर 'या' गेमचेंजर खेळाडूची अखेर टीममध्ये एन्ट्री; पाहा वेस्ट इंडिजविरूद्ध कशी आहे प्लेईंग 11

SCROLL FOR NEXT