Sanjay Raut Big Claim over Shiv sena Split Attack on BJP Amit Shah and CM Eknath shinde Maharashtra Politics Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut News: शिवसेना फुटीबाबत संजय राऊतांचा खळबळजनक दावा; म्हणाले, "एकनाथ शिंदेंनी नव्हे तर..."

साम टिव्ही ब्युरो

Sanjay Raut on Shivsena Crisis: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यांच्या वक्तव्यांची महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगते. काहीवेळा त्यांच्या वक्तव्यांचे कौतुक होते, तर अनेकदा त्यांना यामुळे टीकेलाही सामोरं जावं लागतं. आता संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एक खळबळजनक विधान केलं आहे. शिवसेना फुटण्याला एकनाथ शिंदे जबाबदार नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.  (Latest Marathi News)

शिवसेना एकनाथ शिंदेंनी नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी (Amit Shah) फोडली आहे. भविष्यात ते शिंदे गटालाही नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. अमित शहांचे हेच राजकारण आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. ते पत्रकारपरिषदेत बोलत होते. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

"एकनाथ शिंदेंमध्ये काहीही ताकद नव्हती"

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना फोडली हे खोटं आहे. खरं म्हणजे हा पक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोडला आहे. भाजपनेच हा पक्ष फोडला आहे. हा त्यांनी घेतलेला सूड आहे, एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काहीही ताकद नव्हती. ते फारतर ७-८ लोक घेऊन जाऊ शकत होते. त्यांची क्षमता तेवढीच होती. बाकी आमदार केंद्रीय सत्तेचा दुरुपयोग, निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था त्यांच्या टाचेखाली असल्याने गेले, असंही संजय राऊत म्हणाले.

"एकनाथ शिंदे दबावाला बळी पडले"

शिवसेनेची मुंबई आणि महाराष्ट्रावरील पकड कमी करणे हे भाजपचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांना शिवसेना फोडायचीच होती. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर, पैसा, दहशत अशी सर्व हत्यारे अमित शहांनी वापरली. शिवसेना फोडून महाराष्ट्र कमजोर करण्यात आला. एकनाथ शिंदेंना देखील ईडीची भीती होती. ते आदित्य ठाकरेंसमोर रडले होते. त्यांनी मन खंबीर ठेवावे, असे आमचे म्हणणे होते. मात्र, ते दबावाला बळी पडले, असंही संजय राऊत म्हणाले. (Maharashtra Political News)

"भविष्यात भाजपला नष्ट केल्याशिवाय राहणार नाही"

शिवसेना फोडणाऱ्या भाजपला आम्ही महाराष्ट्रातून नष्ट केल्याशिवाय राहणार नाही, असं देखील संजय राऊत यांनी सांगितलं आहे. आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. हे मलाही माहित आहे की आपण खंबीर राहिला पाहिजे. आपलं मन खंबीर ठेवलं पाहिजे हेही दिवस निघून जातील घाबरून चालणार नाही. पण हे लोक घाबरले आता मोठ्या आव्हानात आहेत. भविष्यात भारतीय जनता पक्ष यांना नष्ट केल्याशिवाय राहणार नाही आणि ती सुरुवात झालेली आहे, असं संजय राऊत म्हणाले.

ठाकरेंनी शिंदे पुत्राचे फाजिल लाड केले

कल्याणमधून लोकसभेवर पूर्वी निष्ठावान शिवसैनिक खासदार म्हणून निवडून येत होते. मात्र, एकनाथ शिंदेंनी ती जागा आपले पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मागितली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी औदार्य दाखवत श्रीकांत शिंदेंना दोनदा तेथून खासदार म्हणून निवडून आणले. पण, उद्धव ठाकरेंनी शिंदे पुत्राचे फाजिल लाड केले, हे नंतर कळाले. केवळ कल्याणच्या जागेसाठी नव्हे तर भाजप एका-एका जागेसाठी शिंदे गटाला असाच रडवेल व हळूहळू नष्ट करून टाकेल. त्याची सुरूवात आता झाली आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : शरद पवार गटाकडे 1652 इच्छुकांचे अर्ज, देवळालीतून 62 सर्वाधिक इच्छुक

NABARD Recruitment 2024 : १० वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ३५ हजर रुपये पगार अन् बँकेत नोकरी, आजच अर्ज करा

Mumbai News: केंद्रात, राज्यात तुमचे सरकार, छत्रपतींचे स्मारक का उभारले नाही? संभाजीराजे संतापले; मुंबईत हायहोल्टेज ड्रामा

Beed Crime : ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; फरार शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

Bigg Boss Grand Finale : 'तौबा-तौबा' अन् 'झापुक झुपूक'ची रंगणार जुगलबंदी; अभिजीत-सूरजचा जबरदस्त डान्स, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT