Sanjay Raut news Saam tv
मुंबई/पुणे

६ फुटीर खासदारांची काय डील झाली? कोणाला मिळणार मंत्रिपद? संजय राऊतांचा धक्कादायक दावा

sanjay Raut news : संजय राऊत यांनी फुटीर खासदारांवर जोरदार टीका केली आहे. फुटीर खासदारांपैकी एकाला मंत्रिपद मिळणार असल्याचाही दावा त्यांनी केला.

Vishal Gangurde

संजय राऊतांची फुटीर खासदारांवर जोरदार टीका

६ खासदारांची मोठी डील झाल्याचा संजय राऊतांचा दावा

संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ

ठाकरेंचे ६ फुटीर खासदार येत्या २ दिवसांत शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. ९ पैकी तब्बल ६ खासदार फुटल्याने ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे. तर ६ खासदारांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यास उपमुख्यमंत्र्यांची राजकीय ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे. या राजकीय घडामोडींदरम्यान संजय राऊत यांनी धक्कादायक दावा केला आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. तर फुटीर खासदारांवरही जोरदार टीका केली. तर धक्कादायक दावा करताना म्हटलं की, 'फुटीर खासदारांपैकी एकाला मंत्रिपद मिळेल. इतरांना प्रत्येकी वाढीव २५ कोटी रुपये मिळतील. त्यांची रात्री ही डील झाली आहे. फुटीर खासदार बिळात लपून बसले आहेत. महाराष्ट्राचं गृहखातं गद्दारांना संरक्षण देत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. गुन्हेगारी वाढली आहे. अपहरणाचे प्रकार वाढले आहेत. संपूर्ण पोलीस दल गद्दारांच्या रक्षणासाठी लावलं आहे'.

'गद्दारांनी हिंमतीवरून फिरून दाखवावे. तुम्ही ५० कोटी रुपये घेतले. तु्म्ही हिंमतीवर २०० कोटींची ठेके घेतले. त्याच हिंमतीवर रस्त्यावर मोकळेपणाने फिरून दाखवावे. लाज असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा. आम्ही पक्षासाठी रक्ताचं पाणी केलं, थोडीतरी लाज असेल, तर राजीनामे द्या. त्यानंतर उघडपणे निवडणुकीला सामोरे जा. गद्दारीचं समर्थन भाजपचे लोक करत आहेत. अर्धा तास ईडी सीबीय मिळू दे. महाराष्ट्रात भाजपचे ७ तुकडे होतील. सर्वात आधी गिरीश महाजन फुटतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

'संजय दिना पाटील शिवसेनेमुळे जिंकले. त्यांना जायचं काहीच कारण नव्हतं. त्यांच्या मुलीला तिकीट दिलं. निष्ठावतांना डावलून कौटुंबिक हट्टासाठी मुलीला तिकीट दिलं. सगळ्यांचा विरोध होता. आम्ही बैठकीसाठी संजय दिना पाटील यांची वाट पाहत होतो. पक्ष संकटात असताना कर्तव्य बजवावे, असं त्यांना वाटलं नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केला. तसेच शिंदेंच्या संपर्कात ठाकरेंचे ५० नगरसेवक असल्याचा दावा निरर्थक असल्याचं त्यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रात पुन्हा कंत्राटदाराची आत्महत्या; वर्षभरात 3 कंत्राटदारांनी संपवलं जीवन

नायब तहसीलदाराची गुंडगिरी? नायब तहसीलदारांनं धरली शेतकऱ्याची कॉलर

Adani-Ambani Face-Off: मराठी सण गुजराती ब्रँडिंग; गणेशोत्सवात अदानी-अंबानी वॉर

कंगना-क्रितीच्या वादात राहुल गांधींची उडी; क्रिती सॅननच्या जाहिरातीनं राजकारण तापलं

Firing On Singer: जिमबाहेर घात लावून बसले, बाहेर येताच गायकावर झाडल्या धाडधाड २० गोळ्या

SCROLL FOR NEXT