Sanjay Raut On Raaj Thackeray
Sanjay Raut On Raaj Thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

Raj Thackeray : राऊतांविषयी केलेलं राज ठाकरेंचं ते भाकीत खरं ठरणार? चर्चांना उधाण

प्रदीप भणगे

दिवा : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना 14 तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक करण्यात आली. या कारवाईबद्दल सर्वच पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेलं एक जुनं विधान सध्या सोशल मीडियावर व्हायरलं झालं आहे. संजय राऊत यांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी असं भाकीत राज ठाकरे यांनी केलं होतं. (Raj Thackeray On Sanjay Raut)

मार्च महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एका कार्यालयाच्या उद्घाटनला दिवा शहरात आले होते. यावेळी पत्रकारांनी राज ठाकरेंना संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली होती. 'आमचं राजकारण मिमिक्रीवर चालत नाही', असं संजय राऊत म्हणाले होते. त्यावर 'आता त्यांनी एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी,' असं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं होतं.

याशिवाय एप्रिल महिन्यात एका जाहीर सभेत संजय राऊतांवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले होते की, "आज पवारसाहेब संजय राऊंतवर खुश आहेत.कधी टांगलेला दिसेल कळणार पण नाही." दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने रविवारी सकाळी सात वाजताच संजय राऊत यांच्या भांडुपमधील निवासस्थानी छापे टाकले. (Sanjay Raut Todays News)

जवळपास 14 तासांच्या छापा आणि चौकशीनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेतलं. राऊत यांना ईडी कार्यालयात नेऊन पुन्हा चौकशी केली आणि रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांना अटक केली. संजय राऊत यांच्या अटकेनंतर राज ठाकरे यांच्या जुनी वक्तव्ये पुन्हा चर्चेत आली असून मनसेच्या कार्यकर्त्यांकडून याबाबत सोशल माध्यमातून व्हायरल केली जात आहेत.

त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाकीत आता खरं ठरणार का हे पाहावे लागेल. दरम्यान या वक्तव्यांवरुन संजय राऊत यांच्या अटकेबाबत राज यांनी अप्रत्यक्ष संकेत दिले होते, अशीही चर्चा आता रंगली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

‘Mothers Day’ निमित्त आईने दिलेलं गिफ्ट पाहून Hemangi Kavi भावूक; विनोदी कार्यक्रमात भरून आला उर

Benifits of Hibiscus: केसांच्या आरोग्यासाठी बहुगुणी ठरते जास्वंद; 'या' पद्धतीनं करा वापर

Today's Marathi News Live : गारखेडा भागामध्ये गर्भनिदान चाचणी करणाऱ्या सेंटरवर छापा

Kolhapur Crime News: धक्कादायक! दारूच्या नशेत तरूणाने केली मित्राची हत्या, कोल्हापुरमधील घटना

Vidya Balan : प्रेमात धोका मिळताच विद्याने घेतला मोठा निर्णय; स्वत: केला खुलासा

SCROLL FOR NEXT