सचिन जाधव -
पुणे: ज्या पक्षाचे दोन मंत्री भ्रष्टाचारच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत. अनेक नेत्यांवर खटले सुरू असतील अशा पक्षाला टीका करण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा सवाल करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.
राज्य मंत्रीमंडळाचा आज विस्तार झाला. या मंत्रीमंडळात शिंदे गटाचे ९ आणि भाजपचे ९ अशा एकूण १८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र आजच्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये यवतमाळमधील शिवसेना नेते आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली.
मात्र, राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उडवली आहे. संजय राठोडांच्या विरोधात भाजपनेच आंदोलन केले, त्यांनीच मंत्रिमंडळात घेतले असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला आहे.
विरोधकांच्या याच टीकांवरती देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार होत नाही म्हणून काही लोक बोलत होते. आता विस्तार झाला, सरकार पडेल अस काही लोक म्हणत होते,आता विस्तार झाला सरकारही मजबूत आहे. शिवाय काही ही प्रश्न उपस्थितीत झालेला नाही.
महिला मंत्री नाही हा जो आक्षेप आहे तो लवकरच दूर होईल आणि महिलांना योग्य प्रतिनिधित्व आमच्या मंत्रिमंडळात मिळेल. त्यांनीही पहिल्यादा विस्तार केला तेव्हा पाच मंत्री घेतले त्यात कुठलीही महिला घेतली नव्हती. त्यांना असं बोलण्याचा काहीही अधिकार नाही.
शिवाय ज्या पक्षाचे दोन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये असून अनेक नेत्यांवर खटले सुरू आहेत. त्या पक्षाला अशा प्रकारची यादी टाकण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे का? असा राष्ट्रवादीला प्रश्न असून त्यांनी पहिल्यादा त्यांनी आरसा पाहवा आणि नंतर त्यांनी आशा प्रकारचं ट्विट करावं असंही ते म्हणाले. तसंच संजय राठोड संदर्भात मुख्यमंत्री यांनी भूमीका स्पष्ट केली आहे यावर बोलायच काम नसल्याचंही फडणवीस म्हणाले.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.