नरेंद्र मोदी दिल्लीत 'माझ्या' घरासमोर राहतात: संजय राऊत
नरेंद्र मोदी दिल्लीत 'माझ्या' घरासमोर राहतात: संजय राऊत Saam Tv
मुंबई/पुणे

नरेंद्र मोदी दिल्लीत 'माझ्या' घरासमोर राहतात: संजय राऊत

गोपाल मोटघरे

पुणे: पुण्यातील भोसरीमध्ये झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) बोलत होते. तिथे त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. शिवसेने विषयी बोलताना ते म्हणाले बाळासाहेबांच्या शिवसेनेचं वैशिष्ट म्हणजे सामन्यातील सामन्यांना बाळासाहेबांनी राजकारणात आणलं. शिवसेना नसती तर आम्ही आज काही नसतो. दिल्लीतील पत्याविषयी बोलताना ते गंमतीनं म्हणाले दिल्लीतील सर्वात प्रतिष्ठित भागात मी राहतो. मी लोकांना माझा पत्ता काय सांगतो तर पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या घरा समोर राहतात.

भोसरी विधानसभा क्षेत्रातून आज शिवसेनेचा एकही नगरसेवक निवडून आला नाही याची मला खंत वाटते असेही ते म्हणाले. भोसरी मतदारसंघाने जर थोडाफार हात दिला असता तर, आज आढळराव पाटील लोकसभेत असते असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणूकीविषयी बोलताना ते म्हणाले शिवसेनेचं पिंपरी चिंचवड मध्ये 100 नगरसेवक निवडून यावे अस मी कधी म्हणणार नाही. पण एवढे नगरसेवक निवडून यावेत की महापौर हा शिवसेनेचाच व्हायला हवा.

इथे उपमुख्यमंत्र्यांचा दरारा आहे असे म्हणतात ते कोणाचं ऐकत नाहीत. पण उपमुख्यमंत्र्यी हे मुख्यमंत्र्यांच ऐकतात. आणि दादांनी नाही ऐकलं तर 'मुख्यमंत्री आज दिल्लीला गेले असे म्हणत त्यांनी एकच हशा पिकवला. पण मुख्यमंत्री दिल्लीला का गेलेत याचं खरं कारण देताना ते म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्ली देखील काबाजी करायची आहे, म्हणून मुख्यमंत्री दिल्ली चा अंदाज घेण्यासाठी गेले आहेत.

बाळासाहेबांचा जन्म पुण्यात झाला मात्र या पुण्यात बाळासाहेबांच्या पक्षाची सत्ता नाही याची खंत आमच्या मनात आहे असेही राऊत म्हणाले. महापालिकेतील युतीविषयी बोलताना ते म्हणाले महापालिका निवडणुक आम्हला सोबत घेऊन लढायची आहे. आलात तर तुमच्या सोबत नाहीतर तुमच्या शिवाय पण आपल्याला प्रत्येक जागेसाठी तयारी करायची आहे. यावेळी बोलताना त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी काही कानमंत्र दिले. कामाला लागून महापालिकेत आपली सत्ता कशी येईल याची तयारी करावी असेही ते म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : रोहित वेमुला मृत्यू प्रकरणाचा पुन्हा तपास होणार

IRCTC Hotel Service : स्टेशनवर 100 रुपयांत मिळणार हॉटेलसारखी रूम; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Amaravati Express Fire : दादर रेल्वे स्थानकात अमरावती एक्सप्रेसला आग, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

CBSE Results 2024: प्रतीक्षा संपली! सीबीएसई १० आणि १२ वीचा निकाल कधी लागणार? महत्वाची अपडेट आली समोर

Loksabha Election: प्रसिद्ध गायक नंदेश उमप लोकसभेच्या रिंगणात; ईशान्य मुंबईमधून भरला अर्ज

SCROLL FOR NEXT