Uddhav Thackeray News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Politics : 'उरलेल्या शिवसेनाप्रमुखांनी मविआचा...'; अमोल किर्तीकरांच्या उमेदवारीवरुन संजय निरुपमांचा ठाकरे गटावर निशाणा

Sanjay Niripam Tweet : उद्धव ठाकरेंच्या या घोषणेनंतर काँग्रेसकडून इच्छूक असलेल्या संजय निरुपम यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय खिचडी घोटाळ्यातील घोटाळेबाजाचं नाव ठाकरे गटाने सुचवल्याची टोकाची टीका निरुपम यांनी केली आहे.

सूरज सावंत

Sanjay Nirupam News :

महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी यांनी शनिवारी अमोल कीर्तीकर यांची मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या या घोषणेनंतर काँग्रेसकडून इच्छूक असलेल्या संजय निरुपम यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय खिचडी घोटाळ्यातील घोटाळेबाजाचं नाव ठाकरे गटाने सुचवल्याची टोकाची टीका निरुपम यांनी केली आहे. एक्स अकाऊंटवर ट्वीट करत त्यांना आपली भूमिका मांडली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय म्हणाले संजय निरुपम?

संजय निरुपम यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, 'काल संध्याकाळी उरलेल्या शिवसेनाप्रमुखांनी अंधेरी येथील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित केला. त्यानंतर रात्रीपासून फोन येत आहेत. हे कसे होऊ शकते? महाविकास आघाडीच्या दोन डझन बैठका होऊनही जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. अद्याप निर्णय न झालेल्या प्रलंबित ८-९ जागांपैकी ही एक जागा आहे. असे मला जागावाटप बैठकीमध्ये सहभागी झालेल्या काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे.' (latest marathi news)

'परस्पर शिवसेनेचा उमेदवार जाहीर करणे हे युती धर्माचे उल्लंघन नाही का? की काँग्रेसला कमीपण दाखवण्यासाठी असे कृत्य जाणीवपूर्वक केले जात आहे? काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाने हस्तक्षेप करावा. शिवसेनेने कोणाचे नाव सुचवले आहे? तो खिचडी घोटाळ्यातील घोटाळेबाज असून त्याने खिचडी पुरवठादाराकडून चेकने लाच घेतली आहे', अशी टीका संजय निरुपम यांनी अमोल किर्तीकर यांच्यावर केली.

'कोविडच्या काळात, बीएमसीकडून स्थलांतरित मजुरांना मोफत अन्न पुरवण्याचा एक स्तुत्य कार्यक्रम राबवला होता. ठाकरे गटाकडून जाहीर केलेल्या उमेदवाराने गरिबांना जेवण देण्याच्या योजनेतून कमिशन घेतले आहे. ईडी संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते अशा घोटाळेबाज उमेदवाराचा प्रचार करतील का?', असा सवाल संजय निरुपम यांनी दोन्ही पक्षांच्या प्रमुखांना विचारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara News : सातारा डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणात ट्विस्ट, पीडितेच्या हात आणि पत्रावरील हस्ताक्षर जुळत नाही? ठाकरे गटाचा मोठा दावा

'१ वाजता आली, चेहऱ्यावर चिंता अन्..' 'त्या' रात्री डॉक्टर तरूणीसोबत काय घडलं? हॉटेल मालकानं सर्वच सांगितलं

Badlapur Crime: साताऱ्यानंतर बदलापुरात खळबळ; डॉक्टर महिलेवर प्राणघातक हल्ला

Maharashtra Live News Update: महाडमध्ये रेल्वे यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमरण उपोषण

India vs Australia: ऐन रंगात आलेल्या मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय; वरुणराजाच्या गोंधळानं पहिल्या टी२० सामना रद्द

SCROLL FOR NEXT