Government Decision : राज्य सरकारचा निर्णयांचा धडाका; दोन दिवसात २६९ शासन निर्णय

Government Decision News : आचारसंहिता लागण्यापूर्वी दोन दिवसात तब्बल 269 शासन निर्णयांचा धडाका राज्य सरकारने लावला आहे. पदस्थापना, जल प्रकल्प, कोकणातील कामे, निधींची पूर्तता अशा शासन निर्णयाचा यामध्ये समावेश आहे.
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit PAwar
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit PAwar Saam Tv
Published On

सचिन गाड | मुंबई

Mumbai News :

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने निर्णयांचा धडाकाच लावला आहे. राज्य सरकारच्या वतीने दोन दिवसात २६९ शासन निर्णय घेण्यात आले आहेत. निधी वाटपासह, पदस्थापना, जलप्रकल्प विविध रस्त्यांची काम तसेच कोकणातील विविध कामांचा समावेश यामध्ये समावेश आहे.

आचारसंहिता लागण्यापूर्वी दोन दिवसात तब्बल 269 शासन निर्णयांचा धडाका राज्य सरकारने लावला आहे. पदस्थापना, जल प्रकल्प, कोकणातील कामे, निधींची पूर्तता अशा शासन निर्णयाचा यामध्ये समावेश आहे. आचारसंहितेपूर्वी शासन निर्णय जारी करून कामे आटपण्याची राज्य सरकारला घाई असल्याचं यातून दिसत आहे.  (Latest Marathi News)

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit PAwar
Maharashtra Politics : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा कोण लढणार? नारायण राणे-उदय सामंत यांच्या गुप्त बैठक झाल्याची माहिती

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागू शकते. त्यामुळेच राज्य सरकारने सहा आणि सात मार्च या दोन दिवसात गतिमान पद्धतीने तब्बल 269 शासन निर्णय जारी केले आहेत. 7 मार्च रोजी 173 शासन निर्णय तर 6 मार्चला 96 शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास सर्व कामे ठप्प होऊ नयेत, आणि आठ नऊ आणि दहा मार्चला सलग सुट्ट्याचा विचार करून तातडीने 6 आणि 7 मार्च रोजी शासन निर्णय जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit PAwar
Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघासाठी अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर

यामध्ये प्रामुख्याने निधी वितरणाचे शासन निर्णय, राज्य उत्पादन शुल्का सारख्या महत्त्वाच्या विभागातील पदस्थापना, कोकणातील काही योजनांना मान्यता देण्यासंदर्भातील शासन निर्णय यांचा समावेश यामध्ये आहे. आता यामध्ये सोमवार, मंगळवार या दोन दिवसात मंत्रिमंडळाची बैठक घेऊन काही महत्त्वाचे निर्णय यामध्ये घेतली जाण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com