Eknath Shinde On Mumbai Cleanliness campaign: Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: स्वच्छता कर्मचारी मुंबईचा खरा हिरो, शहरात राबवली जाणार अर्बन फॉरेस्ट संकल्पना: मुख्यमंत्री

Mumbai Cleanliness campaign: मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र राबविण्यात येईल, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

साम टिव्ही ब्युरो

Eknath Shinde On Mumbai Cleanliness campaign:

प्रदूषण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी झाडे लावण्याबरोबरच स्वच्छता अभियान प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र राबविण्यात येईल, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्वच्छ माझा महाराष्ट्र या महास्वच्छता अभियानास प्रारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात स्वच्छता अभियानास प्रारंभ केला. त्यानंतर हे अभियान मुंबई शहरात राबवले. या अभियानाचा परिणाम खूप चांगला आहे. त्यामुळे हे अभियान आता राज्यात सर्वत्र राबविण्यात येणार आहे. स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियानासाठी एक कार्य प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रात स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. या अभियानात लोकांना सहभागी करून घेण्यात यावे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्वच्छता अभियान लोकचळवळ झाली

मुंबई शहरात सुरू केलेल्या या अभियानात शाळा, महाविद्यालय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध प्रतिष्ठान सहभागी होत आहेत. यामुळे या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप येत आहे. मुंबई डीप क्लीन ड्राईव्हचे एक मॉडेल तयार झाले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. (Latest Marathi News)

मुंबईत अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबविणार

विकास प्रकल्पामुळे तोडाव्या लागलेल्या झाडांचे पुनर्रोपण करणार आहे. मुंबईत रिकाम्या जागेवर झाडे लावली जाणार आहेत. मुंबई शहरात अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबविण्यासाठी विचार सुरू आहे. ठाणे शहरातील कोपरी परिसरापासून गायमुख पर्यंत ग्रीन पॅच तयार केला जात आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

स्वच्छता कर्मचारी मुंबईचा खरा हिरो

मुंबई शहरातील स्वच्छता कर्मचारी खरा हिरो आहे. कारण ते सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करतात. मुंबई स्वच्छ ठेवतात. या कर्मचाऱ्यांच्या वसाहती स्वच्छ ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. सफाई कर्मचारी यांना विमा सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सफाई कर्मचारी यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

World : जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? हनिमूनसाठी सर्वात रोमँटिक ठिकाण

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

SCROLL FOR NEXT