Washim Accident: Saam tv
मुंबई/पुणे

Washim Accident: समृद्धीवर अपघात सत्र सुरूच! पुण्याहून वर्ध्याला जाताना कार अपघात, एकाचा मृत्यू; ऐन दिवाळीत कुटुंबावर शोककळा

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघात सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. समृद्धी महामार्गावर आज शनिवारी पुन्हा एकदा अपघात झाला आहे.

Vishal Gangurde

Samruddhi mahamarg accident News:

समृद्धी महामार्गावर अपघात सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. समृद्धी महामार्गावर आज शनिवारी पुन्हा एकदा अपघात झाला आहे. वाशिमच्या कारंजा तालुक्यात अपघात झाला आहे. या अपघातात एक ठार तर दोन गंभीर जखमी आहेत. तर एक जण किरकोळ जखमी झाले आहे. (Latest Marathi News)

अपघात कसा झाला?

समृद्धी महामार्गावरून पुणे-वर्धा येथे प्रवास करताना वाशिम जिल्ह्यातील कारंजा टोल प्लाझाजवळ रस्ते अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात वेगाने येत असताना महामार्गावर लावण्यात आलेल्या बॅरिकेट्समुळे कार चालकाने अचानक गाडीचे ब्रेक मारले.

चालकाचं ब्रेक मारताना गाडीवर नियंत्रण सुटलं. त्यामुळे कार दोन वेळा उलटली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दोघे जखमी झाले आहेत. तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या अपघातात कौस्तुभ मुळे यांचा मृत्यू झाला आहे, तर अंकित गडकरी,कार्तिक निपोडे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तर संजय विलास गावंडे हे किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघात झाल्यानंतर जखमी रुग्णांना तात्काळ समृद्धी महामार्ग द्वारा उपजिल्हा रुग्णालय कारंजा लाड येथे दाखल करण्यात आले. दरम्यान तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथम उपचार करून जखमी रुग्णांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे दाखल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert: पुढचे १० तास महत्वाचे! वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, ताशी ७० ते ८० वेगाने वारे वाहणार; महाराष्ट्रासह १६ राज्यांना इशारा

आधी ज्योतिष्याला OSDपद, आता चित्रपट निर्मात्याची थेट कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्ती; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानं खळबळ

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई ते दिल्लीसह 9 मार्गांवर वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस; सरकारचा मोठा निर्णय

Water Intake: तुमच्या वजनानुसार किती पाणी प्यावे? जाणून घ्या पाण्याचे योग्य प्रमाण किती?

Maharashtra News Live Update: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; कार्ला फाट्याजवळ ५ किमीपर्यंत रांग

SCROLL FOR NEXT