समीर वानखेडे यांच्यावर मुंबई पोलिसांकडूनच ठेवली जातेय पाळत? Saam Tv
मुंबई/पुणे

समीर वानखेडे यांच्यावर मुंबई पोलिसांकडूनच ठेवली जातेय पाळत?

मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली

सुरज सावंत

मुंबई : मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली आहे. मुंबई पोलीस विभागामधील अधिकारीच आपल्या हालचाली पाळत ठेवत असल्याचा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. समीर वानखेडे आपल्या इतर अधिकाऱ्यांबरोबर मुंबई पोलिसांच्या २ वरिष्ठ अधिकाऱ्यांना आज भेटले आणि त्यांनी तक्रार दाखल केली आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, "मागील काही दिवसांपासून मुंबई पोलिसांमधील काही कर्मचारी माझ्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत" यासंदर्भात एक सीसीटीव्ही फुटेज देखील त्यांनी या पोलीस अधिकाऱ्यांनाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. यामध्ये २ पोलीस कर्मचाऱी साध्या कपड्यांमध्ये आपला पाठलाग करत असल्याचे दिसून आले असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. आपण नेमके कुठे जातो, कोणाला भेटत आहोत? हे टिपत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच वानखेडेच्या आईचे २०१५ मध्ये निधन झाले आणि तेव्हापासून ते नेहमी स्मशानभूमीला भेट देत आले आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओशिवरा पोलिसांचे २ पोलिस त्या स्मशानात गेले, जेथे त्यांनी वानखेडेच्या हालचालीचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज घेतले आहेत. आर्यन खान प्रकरणी मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर ही कारवाई बनावट असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. कारण एनसीबीच्या कारवाई वेळेस त्या ठिकाणी भाजपचे काही नेते देखील आढळून आल्यामुळे त्यांनी ही कारवाई भाजपनेच घडवून आणल्या असल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर सतत आरोप होत असल्यामुळे आपल्यावर नजर ठेवली जात असल्याचा संशय समीर वानखेडे यांनी व्यक्त केला असून याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: 36 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! भारतीय ज्युडोपटूंचा इतिहास; अस्मिता डे आणि हर्ष सिंह यांची सुवर्णपदकाची कमाई

Maharashtra News Live: आदेश आला तर मंत्रीपद सोडण्याची तयारी- भरत गोगावले

गुलाबी अदा! प्राजक्ता माळीचे सुंदर फोटो पाहून नजर हटत नाही

BJP: मोठी बातमी! भाजपला मोठा हादरा, आमदाराचा तडकाफडकी राजीनामा

नीट पेपर फुटतो कसा? सुप्रिया सुळेंचा आक्रमक सवाल; सरकारला या २ गोष्टी सूचवल्या, बघा VIDEO

SCROLL FOR NEXT