गडचिरोली : पोलीस उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या पोमके गट्टा हद्दीत मिळालेल्या माहितीच्या आधारे गट्टा (जा) जंगल परिसरामध्ये गडचिरोली विशेष अभियान पथकाचे जवान नक्षल विरोधी अभियान राबवत असतांना जहाल नक्षली अजय हिचामी ३० वर्षे रा.झारेवाडा पोमके गट्टा (जांबिया) ता . एटापल्ली जि. गडचिरोली यास अटक करण्यात आली आहे. गडचिरोली पोलिसांना त्याला पकडण्यास यश प्राप्त झाले आहे. अटक करण्यात आलेल्या जहाल नक्षलीवर शासनाने २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
हे देखील पहा-
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक(प्रशासन) समीर शेख , अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे यांच्या नेतृत्वात गट्टा (जा.) जंगल परिसरामध्ये गडचिरोली विशेष अभियानपथकाचे जवान नक्षल विरोधी अभियान राबवित असता सदर जहाल नक्षली अजय हिचामी यास अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेला जहाल नक्षली हा सन २०१९ मध्ये नक्षल गट्टा दलममध्ये भरती होवुन सशस्त्र दलम सदस्य पदावर कार्यरत होता. तसेच तो नक्षलच्या अॅक्शन टीमचा सदस्य म्हणून देखील होता.
सन २०२१ मध्ये पोमके गट्टावर २ वेळा झालेल्या पोस्ट अटैक, पोमके बुर्गीवर झालेल्या पोस्ट अटॅक मध्ये त्याचा समावेश आहे. तसेच १८ सप्टेंबर २०२१ दिवशी सुरजागड या ठिकाणी झालेल्या सोमाजी चैतु सडमेक याच्या खुनामध्ये त्याचा चांगलाच सहभाग होता. २०१९ पासुन आजतागायत त्याच्यावर एकुण ३ खून , ५ चकमक आणि १ दरोडयाचा असे एकुण ९ गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्या नक्षली कारवाया आणि नक्षली प्रसारास आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
याव्यतिरीक्त त्याचा आणखी किती गुन्ह्यात सहभाग आहे, याचा तपास गडचिरोली पोलीस करत आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी नक्षलवादांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्याकरिता नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे. नक्षलवादयांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन यावेळी केले आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.