राजेश भोस्तेकर
रायगड : ई- महाभूमी प्रकल्पाचे राज्य समनव्य रामदास जगताप याची शासनाने त्वरित बदली करावी, या मागणीसाठी रायगड जिल्हा तलाठी संघाने अलिबाग या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जगताप यांचा निषेध करून निदर्शने करण्यात आली आहेत. महाराष्ट्र तलाठी महासंघाचे अध्यक्ष डुबल यांना जगताप यांनी मूर्ख म्हटले असल्याने सर्वच तलाठी वर्गात नाराजी आहे. या निषेदार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत.
तालुका स्तरावर तलाठी यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. 12 ऑक्टोबर दिवशी डीएससी ही संगणक प्रणाली पेन ड्राइव्ह तहसीलदार याच्याकडे जमा करण्यात येणार आहेत. जगताप याची बदली करावी अन्यथा 13 ऑक्टोबरपासून कामावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा यावेळी संघटनेन दिला आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
हे देखील पहा-
शासनाने शेतकऱ्यांचे पंचनामे त्वरित तलाठी यांनी करावेत अशा सूचना दिल्या आहेत. तलाठी महासंघाचे राज्य अध्यक्ष डुबल अप्पा यांनी सर्व तलाठी पंचनामे करत आहेत. त्याचबरोबर ई पीक पाहणी आणि मोफत सातबारा वाटप ही महत्वाची कामेही करत आहेत असा संदेश सर्व तलाठी बांधवांना देण्यात आला होता. हा मेसेज पुणे जिल्हा अध्यक्ष तेलंगे यांनी राज्याच्या काही ग्रुपना पाठविला होता. हा मेसेज पाहून जगताप यांनी मूर्खासारखे मेसेज पाठवू नका असे लिहिले आहे.
यामुळे राज्य अध्यक्ष याना जगताप यांनी मूर्ख म्हणून त्याचा अपमान केला आहे. जगताप यांनी डुबल याचा केलेला अपमान हा समस्त तलाठी, मंडळ अधिकारी, कारकून, नायब तहसीलदार याचा असल्याने नाराजी पसरली आहे. याबाबत तलाठी संघटनेमार्फ़त जगताप यांचा जाहीर निषेध करत निदर्शने केली आहेत. याबाबत महसूल मंत्री, महसूल राज्यमंत्री, आयुक्त, जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असल्याचे रायगड तलाठी संघाचे अध्यक्ष संतोष जांभळे यांनी यावेळी सांगितले आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.