Sameer Wankhede SaamTV
मुंबई/पुणे

Breaking |...म्हणून मी मुस्लिम पद्धतीने विवाह केला; समीर वानखेडेंच स्पष्टीकरण

'माझी आई मुस्लिम होती बाबा हिंदू आहेत आणि मी दोघांवरही खूप प्रेम करतो'

सुरज सावंत

मुंबई : समीर वानखेडेंच लग्न (Sameer Wankhede marriage) ज्या मौलानानं लावलं आहे त्यांनी समीर वानखेडे हे मुस्लिम (Muslim) आहेत त्यांचे वडील, बहीण, आई सगळे मुस्लिम आहेत, समीरच्या लग्नावेळी ते मुस्लिमच होते, समीर वानखेडे हे खोटं बोलत आहे. तसेच समिर वानखेडे मुसलमान नसतां तर लग्नच लागले नसते असा दावा अँड मुझंम्मिल अहमद (Muzammil Ahmed) यांनी केला आहे. त्यांच्या याच आरोपावरती NCB अधिकारी समीर वानखेडें यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

हे देखील पहा -

ती तर माझ्या आईची ईच्छा -

वानखेडे म्हणाले 'भारत हा पुरोगामी देश आहे त्याचा मला अभिमान आहे. माझी आई मुस्लिम होती बाबा हिंदू आहेत (Mother Muslim father Hindu) आणि मी दोघांवरही खूप प्रेम करतो. माझ्या आईने मुस्लिम पद्धतीने विवाह करण्यास सांगितला तो मी केला कारण मी आईचा शब्द पाळला गुन्हा केला नाही.' तसेच ज्या महिन्यात निकाह झाला त्याच महिन्यात स्पेशल मॅरेज ऍक्टअंतर्गत मी नोंदणी करून घेतली. मी जे केलं तो गुन्हा नाहीये. थोड्याच वेळात माझे बाबा ज्ञानदेव वानखेडे स्पेशल मॅरेज ऍक्टच सर्टिफिकेट (Special Marriage Act) समोर ठेवतील असही वानखेडेंनी सांगितलं.

दरम्यान मी हिंदू असताना माझा मुलगा मुस्लीम कसा असेल हे सर्व आरोप 100 टक्के खोट असल्याचा दावा देखील त्यांचे समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांनी खुलासा केला आहे. तसेच मी स्वत एस सी आहे तर माझा मुलगा मुस्लीम कसा असेल असा सवाल त्यांनी पुन्हा पुन्हा उपस्थित केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी...

Strong Bones : हाडांना कमजोर करतात हे 7 अन्नपदार्थ; तज्ज्ञांनी दिला इशारा

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

SCROLL FOR NEXT