Chhatrapati Sambhajiraje Bhosale Latest News SAAM TV
मुंबई/पुणे

Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजेंनी केली परिवर्तनाच्या क्रांतीची घोषणा

संभाजीराजेंनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी परिवर्तन क्रांतीची घोषणा केली आहे. येत्या ९ ऑगस्टपासून तुळजापूर (Tuljapur) येथून परिवर्तन क्रांतीची सुरूवात होईल. अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. आज सकाळी संभाजीराजेंनी याबाबतंच ट्विट केलं. (Sambhajiraje Chhatrapati Latest News)

'क्रांती दिनी होणार महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरूवात...भेटूया ९ ऑगस्ट रोजी तुळजापूरला...' असं संभाजीराजेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तुळजाभवानी मंदिरात छत्रपती संभाजीराजे यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. यामुळे मोठा वादंग निर्माण होऊन तुळजापूर शहर बंद देखील ठेवण्यात आले होते. या प्रकारामुळे जनभावना दुखावली गेली होती.

यानंतर संभाजीराजे हे प्रथमच तुळजापूरला येत आहेत. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी क्रांती दिनी तुळजापूर येथून परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात करणार असल्याचे ट्विट केलं आहे.

त्यामुळे राज्यातील सामाजिक व राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून तुळजापूर येथे नेमके काय केले जाणार आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्र्यांच्या समोरच नवनीत राणा यांनी व्यक्त केली पुन्हा खासदार होण्याची इच्छा

Ajit Pawar: अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाची धडक, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Bharat Jadhav- Mahesh Manjrekar: भरत जाधव अन् महेश मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र झळकणार, नवीन नाटकाचा प्रयोग कधी?

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींना मिळणार नाहीत ₹१५००; सरकारने दिला इशारा

पर्यटक तरूणीकडे आधी शरीरसंबंधाची मागणी, भररस्त्यावर हस्तमैथून; पीडितेनं VIDEO शूट करून व्हायरल केला, नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT