सचिन जाधव -
पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते, मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पुण्यात छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chhatrapati) यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे यांनी दीपक केसरकर यांना पर्यटन खातं मिळावं अशी इच्छा व्यक्त केली.
रायगड अन् पर्यटन देशात पोहचवाल ही अपेक्षा केसरकरांकडून असल्याचंही ते यावेळी म्हणाले. संभाजीराजे पुढे म्हणाले, 'मंत्रिमंडळावर टीका झाली तो त्यांचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि दीपक केसरकर त्यावर बोलतील. मात्र, आरक्षण आणि मूलभूत सुविधा यासाठी मी उपोषण केलं. ज्यांनी आरक्षण दिलं ते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत.
शिवसेनेन शब्द पाळला नाही -
उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सगळा विषय माहिती आहे. आपल्याला आरक्षणसाठी परत लढायला लागेल. मूलभूत सुविधा तातडीने बैठक बोलाववी आणि समाजाचे प्रश्न सोडवावे. आरक्षणाची सगळी प्रोसेस परत करावी लागणार असून मागासवर्गीय आयोग स्थापन करावे लागणार असल्याचंही संभाजीराजे म्हणाले.
तसंच शिवसेनेनं (Shivsena) शब्द पाळला नाही, आता माझं काही म्हणणं नाही, पण सरकारने प्रश्न सोडवले पाहिजेत, जर प्रश्न सुटले नाहीत तर विचार करू असंही ते यावेळी म्हणाले. तर उदयनराजे आणि संभाजीराजे या दोघांचे आशीर्वाद असणे गरजेच असतं दोघेही आज सुदैवाने आज पुण्यात आहेत. त्यामुळे त्यांची भेट आपण घेतली असल्याचं केसरकरांनी सांगितलं.
शिवसेना माझी म्हणू का -
तर केसकरांनी भेट घेतल्यानंतर केसरकर हे जुने मित्र आहेत. सावंतवाडीला आजोबांकडे जायचो तेव्हापासूनचे मित्र असल्याचं छत्रपती उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhosale) म्हणाले. तसंच शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष स्थापन केला मग मी म्हणू का पक्ष माझा आहे ? असा टोला उदयनराजे यांनी शिवसेनेला यावेळी लगावला.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.