Sambhaji Raje saam tv
मुंबई/पुणे

Sambhaji Raje News: राजकीय नेत्यांवर टीका करताना संभाजीराजेंची जीभ घसरली; म्हणाले सगळेच नेते...

Pune News: स्वराज्य कुठल्याही परिस्थितीत 2024 ला निवडणूक लढवणार; संभाजी राजे यांची घोषणा

Shivani Tichkule

सचिन जाधव

Sambhaji Raje News Today: माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यात स्वराज्य भवनाचं लोकार्पण केले. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीत ताकतीने उतरणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी प्रस्थापित राजकारण्यांवर त्यांनी टीका केली.  (Latest Marathi News)

सगळेच राजकीय नेते माजले आहेत. सगळ्या नेत्यांना वाटतं की आपण सुसंस्कृत आहोत. पण मी सगळ्या नेत्यांचा माज काढू शकतो. चूक त्यांची नाही कारण आपण त्यांना निवडून देतो, हे सगळे लोकं आपल्याल खोट बोलतात. या लोकांनी आपला खेळ खंडोबा केला आहे. वेळ आली की शिवाजी महाराजांच नावं वापरतात. पण आता आपणं बाहेर पडून सर्व सामन्यांना ताकत दिली पाहिजे असं म्हणत संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी राजकीय नेत्यांवर टीका केली आहे.

सरकार कडे मास्टर प्लॅन नाही

आज शिक्षणच बाजारीकरण झाल आहे. सरकार म्हणून ७५ वर्षात यांनी शिक्षणासाठी काय केलं याचं उत्तर या सगळ्या सरकारांनी दिलं पाहिजे. राज्यातून उद्योग बाहेर जात आहेत. सगळ्यात जास्त टॅक्स आपला राज्य भरतो. सगळे मोठे उद्योगपती राज्यातले आहेत. तरी सगळे उद्योग राज्याच्या बाहेर चालले आहेत ही शोकांतिका आहे. सरकार कडे मास्टर प्लॅन नाही. सगळे उद्योग बंद पडले आहेत. सरकारच कसल नियोजन नाही असे देखील संभाजीराजे म्हणाले. (Political News)

सगळे राजकारणी माजले आहेत

राजकारणाची पातळी किती खाली गेली आहे. सगळे राजकारणी माजले आहेत. कुठलाच राजकारणी विकासावर बोलत नाहीतर. सगळे राजकारणी एकमेकांवर टीका करतात. हा संस्कृत महाराष्ट्र आहे का? हा आपल्या साधुसंतांचा महापुरुषांचा महाराष्ट्र आहे का?आपण सुसंस्कृत महाराष्ट्र घडवू वेगळी दिशा देऊ. सगळ्या आमदारांनी खासदारांनी गडकोट किल्ल्यांसाठी काय केलं ते मला सांगावं, असं आव्हान संभाजी राजे यांनी यावेळी दिलं.

2024 ला निवडणूक लढवणार

स्वराज्य कुठल्याही परिस्थितीत 2024 ला निवडणूक लढवणार सा निर्धार संभाजीराजेंनी व्यक्त केला आहे. स्वराज्य यापुढे सक्षम पर्याय म्हणून येणार आहे. त्यामुळे २०२४ साली होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागा. घाबरण्याची गरज नाही. माझा विश्वास आहे, सुसंस्कृत नेता स्वराज्यात येणारचं. आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुण घ्यायचे आहेत,” असेही संभाजीराजेंनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News: देव्हाऱ्याखाली दारूचा साठा सापडला, दृश्य बघून पोलिसही चक्रावले | VIDEO

Face Care: चेहऱ्याला फ्रेश आणि ग्लोईंग ठेवण्यासाठी घरच्या घरी बनवा 'हा' डी-टॅन फेसपॅक

Shocking : संतापजनक! गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार; मांत्रिकाचं 'अघोरी' कृत्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

Shocking : सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने विहिरीत उडी मारून संपवलं आयुष्य; कोल्हापुरात खळबळ

SCROLL FOR NEXT