Sambhajiraje Chhatrapati Rajyasabha Election News Saam Tv
मुंबई/पुणे

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही; संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

Sambhajiraje Chhatrapati Rajyasabha Election News : मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही असं संभाजीराजे भोसले म्हणाले.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhajiraje) यांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajyasabha Election 2022) कोणत्याही पक्षात प्रवेश न करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही असं संभाजीराजे भोसले म्हणाले. (Sambhaji Raje withdraws from Rajya Sabha elections; Serious allegations made against the Chief Minister)

हे देखील पाहा -

संभाजी राजे यांनी सुरुवातीला महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. ते म्हणाले की, मला इतके प्रेम दिले मी विसरू शकत नाही. राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर मी १२ मे ला पुण्यात भूमिका स्पष्ट केली होती. अपक्ष उमेदवारी मी लढणार असे म्हणालो होतो. मला सगळी गणिते माहीत होती. पुढचा प्रवास किती खडतर आहे हे मला माहित होते. मला अनुभवायचे होते. खासदार म्हणून मला कोणी पाठवले हे न पाहता समाजासाठी मी काम करत होतो. राज्यसभेत मला सगळ्यांनी पाठवावे असे वाटत होते. माझ्या रक्तात, तत्वात नाही ते मी आज बोलणार आहे.

संभाजीराजे म्हणाले की, मी मुख्यमंत्री यांना सांगू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ जायचे आणि संभाजी छत्रपती खोटे बोलत असतील तर मुख्यमंत्र्यांनी सांगावे. दोन खासदार मुख्यमंत्री यांनी माझ्याकडे पाठवले. दोन्ही खासदारांनी सांगितले आपण शिवसेनेत प्रवेश करावा. मी स्पष्ट सांगितले मी शिवसेनेत येणार नाही. मुख्यमंत्री यांनी मला फोन केला मी चर्चेला गेलो. तीन मुद्द्यांवर चर्चा झाली. छत्रपती यांना आम्हाला बाजूला ठेवायचे नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री यांनी मला शिवसेनेत प्रवेश करा असे सांगितले मी नकार दिला. शिवसेनेची सीट आहे म्हणतात पण त्यांच्याकडे कोटा नाही. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार मला करा असा मी प्रस्ताव ठेवला. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून मुख्यमंत्री यांनी तयारी दाखवली होती. दोन दिवसांमध्ये मला एका मंत्र्याचा फोन आला सुवर्ण मध्य काढायचे आहे असे म्हणाले. मंत्र्यांच्या सोबत बैठक झाली आणि एक ड्रफ्ट तयार झाला.

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही

मुख्यमंत्री यांचे स्नेही भेटायला आले होते, त्यांनी मला आज ही इच्छा आहे शिवसेनेत तुम्ही प्रवेश करा असे सांगितले, मी नकार दिला. शब्द मला मिळाला म्हणून मी कोल्हापूरला गेलो. मला कागदपत्रं पूर्ण करायची होती म्हणून मी कोल्हापूरला गेलो. तेवढ्यात शिवनसेच्या दोन उमेदवारांनी राज्यसभेचा अर्ज भरला. मी खासदार, मंत्री यांना मी फोन केला. हा काय प्रकार सुरू आहे. शिवसेनेने माझ्या जागी एकाला उमेदवारी जाहीर केली. मुख्यमंत्री यांनी शब्द पळाला नाही असा गंभीर आरोप त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला आहे.

घोडेबाजार होऊ नये यासाठी माघार

पुढे ते म्हणाले की, मी स्वराज्य निर्माण करण्यासाठी मोकळा झालो आहे. मला कोणाचा द्वेष नाही. माझी स्पर्धा ही माझ्याशी आहे. गोरगरीब लोकांच्या पाठीशी स्वराज्य संघटनेच्या माध्यमाने मी उभा राहणार आहे. ज्या आमदारांनी स्वाक्षरी दिल्या त्यांचा मी आभारी आहे. आयुष्यभर त्यांचा आभारी राहील. शिवसेनेत मी जाणार नाही. अनेक आमदारांचे मला फोन येत आहेत. कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी लढवायची. पण मला माहित आहे घोडेबाजार होणार आहे. घोडेबाजार होऊ नये यासाठी मी निवडणुकी समोर जाणार नाही असं म्हणत संभाजीराजेंनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा यांची विजयाकडे वाटचाल

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

SCROLL FOR NEXT