Kashmir : अभिनेत्री अमरीन भट्टची हत्या करणाऱ्या दहशहतवाद्यांचा २४ तासांत खात्मा

Tv Artist Amreen Bhatt Latest News : टीव्ही कलाकार अमरीन भट यांची हत्या करणारे एलईटीचे दोन दहशतवादी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात सुरू असलेल्या चकमकीत अडकले होते.
Tv Artist Amreen Bhatt
Tv Artist Amreen BhattSaam TV

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) बडगाम जिल्ह्यात बुधवारी (२५ मे) ला एका ३५ वर्षीय टीव्ही अभिनेत्री अमरीन भट्ट (Amreen Bhatt) यांची दहशतवाद्यांनी (Terrorist Attack) गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यात अभिनेत्रीचा भाचाही जखमी झाला होता. अभिनेत्रीच्या या हत्येनंतर अवघ्या ४८ तासांत सुरक्षा दलांनी हत्येत सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्यांना अवंतीपोरा येथे शुक्रवारी पहाटे झालेल्या कंठस्नान (Encounter) घातले आहे. हा हल्ला लष्कर-ए-तैयबाच्या (एलईटी) दहशतवाद्यांनी केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. (Jammu Kashmir Tv Artist Amreen Bhatt Death)

हे देखील पाहा -

काश्मीरचे आयजीपी विजय कुमार म्हणाले की, “टीव्ही कलाकार अमरीन भटच्या हत्या प्रकरणाची २४ तासांत उकल झाली आहे.” "श्रीनगरच्या सौरा भागात चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या (LTE) चे दोन दहशतवादी मारले गेले आहेत. शाकीर अहमद वाजा आणि आफरीन आफताब मलिक अशी त्यांची नावे आहेत." त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यासह आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. पुढे ते म्हणाले की, काश्मीर खोऱ्यात गेल्या ३ दिवसांत वेगवेगळ्या चकमकीत जेईएमचे ३ आणि एलईटीशी संबंधित ३ दहशतवादी असे एकूण १० दहशतवादी मारले गेले आहेत. (2 LeT terrorists killed in connection with TV artist Amreen Bhat's murder)

आयजीपी विजय कुमार यांनी यापूर्वी माहिती दिली की टीव्ही कलाकार अमरीन भट यांची हत्या करणारे एलईटीचे दोन दहशतवादी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात सुरू असलेल्या चकमकीत अडकले होते. टीव्ही कलाकार आणि सोशल मीडिया सेन्सेशन अमरीन भट यांची बुधवारी काही अज्ञात दहशतवाद्यांनी बडगाममधील चदूरा भागातील हिश्रू गावात तिच्या राहत्या घरात हत्या केली होती. या घटनेत तिचा भाचाही जखमी झाला असून त्याच्या उजव्या हाताला गोळी लागली.

Tv Artist Amreen Bhatt
इंद्रायणी नदीत कार कोसळली; एक ठार

अभिनेत्रीच्या हत्येमागे एलईटीच्या दहशतवाद्यांचा हात असल्याचे काश्मीरचे आयजीपी यांनी यापूर्वी सांगितले होते. या वर्षातील ही ५१ वी चकमक होती आणि गेल्या ५० चकमकीत सुरक्षा दलांना २५ पाकिस्तानी दहशतवाद्यांसह किमान ७८ दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे, तसेच ४३ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या वर्षी रजेवर असलेल्या पोलिसांसह १४ नागरिकांचाही दहशतवाद्यांनी बळी घेतला, तर जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवायांमध्ये १६ सुरक्षा जवानांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. (LeT terrorists, who murdered TV artist Amreen Bhat, shot dead in encounter in J&K's Awantipora, total 10 killed in 3 days)

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com