Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

संभाजी महाराज आपल्या हृदयात, त्यांचे स्मारक मनाचा ठाव घेणारे असावे; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

संभाजी महाराजांच्या आयुष्यातील घटनांचे प्रतिबिंब हे स्मारक पाहणाऱ्यांच्या मनात उमटावेत इतकं भव्य, देखणे आणि अर्थपूर्ण असे स्मारक व्हावे - उद्धव ठाकरे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे -

मुंबई : छत्रपती संभाजीराजे हे आपल्या हृदयात आहेतच त्यांचे स्मारकदेखील मनाचा ठाव घेणारे असावे. संभाजी महाराजांचे (Sambhaji Maharaj) आयुष्य संघर्षमय असे होते. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार होते, त्यांच्या आयुष्यातील घटनांचे प्रतिबिंब हे स्मारक पाहणाऱ्यांच्या मनात उमटावेत इतकं भव्य, देखणे आणि अर्थपूर्ण असे स्मारक व्हावं असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजी महाराज समाधी विकास आराखडा शिखर समितीची बैठक आज पार पडली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, खासदार अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार आदी उपस्थित होते. या बैठकीत तुळापूर व वढु बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज समाधी स्मारक आराखड्याबाबत संकल्पना सादर करण्यात आला आहे.

हे देखील पाहा -

मागील काही दिवसांपुर्वी उपमिख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन पुणे येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचे तुळापूर येथील स्मारक आणि वढू बुद्रुक येथील समाधीस्थळाच्या २६९ कोटी ३४ लक्ष रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली होती.

यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि वढू बुद्रुक (Vadhu Budruk) येथील संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ विकास आराखड्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काम सुंदर आणि भव्य होईल याकडे विशेष लक्ष द्यावे.

स्मारक आणि समधीस्थळाला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येण्याची शक्यता लक्षात घेता वाहनतळाचे योग्य नियोजन करावे, लोकप्रतिनिधींनी याबाबत सूचना केल्यास त्यांचाही अंतर्भाव करण्यात येईल, असेही पवार यांनी सांगितले होते त्यानुसार आता आज मुख्यमंत्र्यांनी देखील हे स्मारक उत्तम प्रकारे उभारण्याचे निर्देश दिले आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : नंदुरबारच्या सातपुड्यात पर्यटकांची हुल्लडबाजी | VIDEO

Maharashtra Live News Update : 'भाजप लोकांची घरं फोडून राजकारण करतं'- उद्धव ठाकरेंचा घणाघात

Karjat near waterfall: कर्जतपासून अवघ्या 20 किमीवर लपलाय 'हा' धबधबा; पावसाचा आनंद घेण्यासाठी बेस्ट ठिकाण

Shravan Month 2025: श्रावण महिन्यात काय करावे अन् काय करू नये?

Low Cost Bike: कमी बजेटमध्ये जास्त फायदे! ‘या’ १० बाईक्स अजूनही किफायतशीर

SCROLL FOR NEXT