St Strike Saam TV
मुंबई/पुणे

ST Strike: ST कर्मचाऱ्यांची सातव्यावेतन आयोगाप्रमाणे पगारवाढ, बडतर्फची कारवाई मागे

परिवहन मंत्री अनिल परब उद्या एसटी कामगारांच्या मागण्यांचे निवेदन सभागृहात पटलावर ठेवणार

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी ST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा ऑक्टोबरपासून संप सुरू आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होणार नसल्याचा अहवाल समितीने दिल्याचे सांगितले होते. त्यावनंतर राज्य परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) यांनी राज्य सरकारने आझाद मैदानावर बसलेल्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांची समिती स्थापन करावी अशी मागणी केली होती.

माजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील ३ सदस्यीय समितीने ST चे विलीनीकरण होण्याची शक्यता नाकारल्यानंतर निंबाळकर यांनी ही मागणी केली होती. त्यानुसार एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा अनिल परब यांनी केल्यानंतर आज एसटी कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी एक बैठक विधान परिषद सभापती यांच्या दालनात पार पडली. याबैठकीत एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली असून परिवहन मंत्री अनिल परब उद्या एसटी कामगारांच्या मागण्यांचे निवेदन सभागृहात पटलावर ठेवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला तसंच कर्मचाऱ्यांना सातव्यावेतन आयोगाप्रमाणे पगार देण्यासाठी सरकारची तयारी असल्याचही सांगितल आहे. ही पगारवाढ टप्याटप्याने होणार आहे शिवाय संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचा निर्णय देखील बैठकीत घेण्यात आला.

आज झालेल्या बैठकीस सभापती, परिवहन मंत्री अनिल परब, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, दिवाकर रावते, शशिकांत शिंदे, सुधीर तांबे,अप्पर मुख्य सचिव परिवहन, प्रधान सचिव,व्यवस्थापकीय संचालक एस टी महामंडळ बैठकीत उपस्थित आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT