Sakal-Saam Survey on Sharad Pawar Retirement
Sakal-Saam Survey on Sharad Pawar Retirement Saam TV
मुंबई/पुणे

Saam Survey: शरद पवारांच्या निर्णयाचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार? सर्वेक्षण अहवाल काय सांगतो?

साम टिव्ही ब्युरो

Sakal-Saam Survey on Sharad Pawar Retirement: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी (२ मे) पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला. पवारांनी त्यांचा हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहेत. (Latest Marathi News)

दरम्यान, पवारांच्या या निर्णयानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर 'सकाळ-साम'च्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा कल जाणून घेतला आहे. यात सर्व वयोगटातील महिला व पुरुषांनी आपली मते व्यक्त केलेली आहेत.

शरद पवारांच्या निर्णयाचा 'मविआ'वर परिणाम होणार?

शरद पवारांच्या (Sharad Pawar) निर्णयाचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार का? असा प्रश्न सर्वक्षणात विचारला असता, ६०.७ टक्के लोकांना असं वाटत आहे की, पवारांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीवर परिणाम होईल. (Breaking Marathi News)

तर २८.४ टक्के लोकांना शरद पवार यांच्या राजीनाम्याचा महाविकासआघाडीवर कुठलाही परिणाम होणार नाही, असं वाटत आहे. याव्यतिरिक्त १०.९ टक्के लोकांनी सांगता येत नाही असं उत्तर दिलं आहे. सर्वेक्षणात सहभागी बहुतांश इतर लोक व इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी पवारांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीवर परिणाम होईल, असे सांगितले आहे.

त्यांची संख्या ६०.७ टक्के आहे. तर त्यांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीवर काहीही परिणाम होणार नसल्याचे मत २८.४ टक्के लोकांनी व्यक्त केले आहे. तसेच १०.९ टक्के लोकांनी सांगता येणार नाही, असे उत्तर दिले आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Voting Live : पाचव्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी समोर; सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Rahul Gandhi: द्वेषाच्या राजकारणाला देश कंटाळलाय..., भाजपवर निशाणा साधत राहुल गांधींनी जनतेला केलं मतदान करण्याचं आवाहन

Mumbai News: कांदिवलीतील फ्लॅटमध्ये आढळले पती-पत्नीचे मृतदेह; धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी चपाती ऐवजी 'या' पोळ्या खा; झटपट बारीक व्हाल

Yoga For Asthma: दम्यावर रामबाण उपाय सापडला;विरासन केल्याने घेता येईल मोकळा श्वास

SCROLL FOR NEXT