Saif Ali Khan Attack  Saam Tv
मुंबई/पुणे

Saif Ali Khan Attack : सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; मध्य प्रदेश कनेक्शन उघड

Saif Ali Khan Attack case latest News Update: सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश आलं आहे. मध्य प्रदेशातून एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

Nandkumar Joshi

सैफ अली खान हल्ला प्रकरणाचा तपास वेगानं सुरू असतानाच मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. पोलिसांनी मध्य प्रदेशातून एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. सध्याच्या घडीला संशयित कोठडीत असून, त्याची चौकशी केली जात आहे.

सैफ अली खानवर त्याच्या मुंबईतील घरात मध्यरात्री हल्ला झाला. यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेनं अख्खं राज्य हादरलं. मुंबईत राहणाऱ्या सेलिब्रिटी तसेच इतर नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे, सैफवर हल्ला करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. मुंबई पोलिसांची वेगवेगळी पथके हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. त्याचवेळी पोलिसांच्या तपासाला काही प्रमाणात यश आलं आहे. मध्य प्रदेशातून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. त्याची आता कोठडीत चौकशी सुरू आहे. हा संशयित सैफवर हल्ला करणारा आहे का, हे तपासून बघितले जात आहे.

मुंबई पोलिसांनी याआधी शुक्रवारी एका संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली होती. मात्र, या संशयिताचा या घटनेशी काहीही संबंध नसल्याचे चौकशीतून समोर आले होते. मुंबई पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी मोहीम तीव्र केली आहे. ३५ हून अधिक पथके तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानवर हल्ला करणारा संशयित मुंबईतील वांद्रे पोलीस ठाणे परिसर ते रेल्वे स्टेशनच्या दरम्यान दिसून आला होता. हल्ल्याच्या घटनेनंतर सकाळी ८ वाजेपर्यंत संशयित हल्लेखोर हा वांद्रे परिसरात फिरत होता. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागू शकला नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी दादरच्या एका मोबाइल दुकानातील सीसीटीव्ही फुटेज घेतले आहेत. सैफ अली खान याच्यावरील संशयित हल्लेखोर हा त्या दुकानात इअरफोन खरेदी करण्यास गेल्याचा दावा केला जात आहे.

करीनानं पोलिसांना दिलेल्या जबाबात काय सांगितलं?

सैफ अली खानची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर हिनं पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे. सैफसोबत झालेल्या झटापटीवेळी हल्लेखोर अधिक आक्रमक झाला होता. त्याने सैफवर चाकूने बरेच वार केले. मात्र, बाहेरच ठेवलेल्या दागिन्यांना त्या हल्लेखोरानं हात देखील लावला नाही, असं करीनानं जबाबात सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT