Drown
Drown saam tv
मुंबई/पुणे

विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू; सह्याद्री स्कूलचे चार शिक्षक निलंबित

रोहिदास गाडगे

राजगुरुनगर : कृष्णामुर्ती फाऊंडेशनच्या सह्याद्री स्कूलमधील (krishnamurti foundation sahyadri school) चार विद्यार्थ्यांच्या (students) चासकमान धरणामध्ये बुडून मृ्त्यू झाल्या प्रकरणी शाळा प्रशासनासह चार शिक्षकांवर (teachers) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान संबंधित चार शिक्षकांना शाळा (school) प्रशासनाने निलंबित केले आहे. (sahyadri international school chaskaman latest marathi news)

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पश्चिम भागात असणा-या चासकमान धरणात सह्याद्री स्कुलमधील दहावीतील चार विद्यार्थ्यांचा 19 मे रोजी पाण्यात बुडून मृत्यू झाला. यामध्ये मृतांमध्ये परीक्षित कुलदिप अग्रवाल (वय १६), नव्या प्रज्ञेश भोसले (वय १६), रितीन डी. धनशेखर ( वय १६), तनिषा हर्षद देसाई (वय १६) यांचा समावेश आहे.

या घटनेनंतर संबंधित मुलांच्या नातेवाईकांनी शाळा प्रशासनास जबाबदार धरत कारवाईची अपेक्षा पाेलीसांकडे व्यक्त केली हाेती. त्यावेळी घटनेचा कसून तपास करुन कार्यवाही केली जाईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी नातेवाईकांना दिले हाेते.

दरम्यान तपासाअंती पाेलीसांनी शाळा प्रशासनासह चार शिक्षकांवर चार विद्यार्थ्यांच्या मृत्यु प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. तसेच याप्रकरणी शाळा प्रशासनाने विनायक शर्मा, श्रीनिधी महिशी, ओमना संताेष आणि जाँल्सी थाँमस यांना निलंबित केले आहे. तसेच त्यांची अंतर्गत चौकशीही सुरु करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flipkart Big Saving Days Sale च्या आधीच iPhone 14, iPhone 12 वर मिळत आहे मोठी सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर

Maharashtra Politics: महाराष्ट्रात सूडाचं राजकारण कशाला हवं? इथं कट्टर विरोधकही धरतात एकमेकांचे पाय

Raj Thackeray: राज ठाकरे महायुतीला का हवेत? महायुतीसाठी मनसे घेणार 'राज'सभा

Baba Ramdev: बाबा रामवेदांना मोठा दणका! पतंजलीच्या 14 उत्पादनांवर बंदी

Gharat Ganpati : 'घरत गणपती' २६ जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर

SCROLL FOR NEXT