sadiq kapoor suicide case farooq inamdar fir registered Saam Tv
मुंबई/पुणे

सादिक कपूर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; अजित पवार गटाच्या पुण्यातील उमेदवारावर गुन्हा

सादिक कपूर आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट. अजित पवार गटाच्या उमेदवार फारूक इनामदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल. सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप, कुटुंबीयांचा न्यायाची मागणी.

Omkar Sonawane

सादिक कपूर आत्महत्या प्रकरणात फारूक इनामदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

सुसाईड नोटमध्ये जमीन वाद, खंडणी आणि पोलिस त्रासाचे गंभीर आरोप

अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या अडचणी वाढल्या

कुटुंबीयांची मुख्यमंत्री व पंतप्रधानांकडे न्यायाची मागणी

सागर आव्हाड, साम टीव्ही

फारूख इनामदार यांच्यामुळेच सादिक कपूर यांनी आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक वर्षांपासून फारूक इनामदार आणि त्यांचे काही साथीदार वेगवेगळ्या माध्यमांतून सादिक कपूर यांना सातत्याने त्रास देत होते तसेच त्यांच्याकडे खंडणीची मागणी करत होते.

यापूर्वी, सन २०१४ मध्ये सादिक कपूर यांच्या पत्नीने तब्बल विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतरही फारूक इनामदार यांचा कथित त्रास थांबला नाही. एका जमिनीच्या वादावरून सादिक कपूर यांना वारंवार त्रास दिला गेला, खंडणी मागण्यात आली तसेच जमीन जबरदस्तीने बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

अखेर या त्रासाला कंटाळून सादिक कपूर यांनी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली आणि त्यामध्ये फारूक इनामदार यांचे नाव नमूद करून आत्महत्या केली, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे आता तरी आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी सादिक कपूर यांच्या कुटुंबीयांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच देशाचे पंतप्रधान यांच्याकडे केली आहे.या प्रकरणाकडे पोलीस प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार का, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

सादिक शेख यांची सुसाईट नोटमधील माहिती

मला आत्महत्याच प्रवृत्त करून खालील गुंडाने माझ्या आयुष्याचे वाटोळे करून माझं कुटुंब आणि माझ्यावर अवलंबून असणाऱ्यांचाही कुटुंब उध्वस्त केलेलं आहे. काळेपडळ पोलीस स्टेशनचे खालील जबाबदार अधिकाऱ्यांनी टिपू पठाण टोळीचा आका फारुक यासीन इनामदार यांच्याकडून दोन कोटींची रक्कम घेऊन मला पूर्ण आयुष्यभर जेलमध्ये चढवण्यासाठी सुपारी घेऊन माझ्यावर दोन डझन कलम लागली आहेत जणू यांना सरकारने मोफत असा वाटावा असे कलमे माझ्यावर लादु न मला आत्महत्या प्रवृत्त केले आहे.

टिपू पठाण टोळीचा आका फारूक इनामदार

टिपू पठाण

जहर सय्यद

आरफान इनामदार

सोफिया इनामदार

अय्यान इनामदार

मुन्ना जहागीरदार

संतोष सुतार

वकील कबीर शेख

तनवीर मण्यार

उमर अगरबत्ती वाला

हाजी मण्यार

असच खान

लोअर दिस हॅरी स्वामी

रॉयल दुकान चालवणारे गुंड

रॉयल हॉटेल चालवणारे गँगस्टर

यांच्यासोबत दहा ते पंधरा गुंड सर्व ताबा घेऊन बिल्डिंग आणि शेडच्या कामाचे उपस्थित असलेले हत्यार बंद गुंड यांचा समावेश आहे.

सोबतच त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांचे नाव देखील सुसाईड नोटमध्ये लिहिलेले आहे. मानसिंग पाटील, अमर काळंगे, प्रवीण अबदागिरे, राजकुमार शिंदे, धनाजी ढोणे या सगळ्यांनी चार दिवसात दोन महिने दाखल केले आहेत. सोबतच धनाजी ढोणे आणि त्यांच्या सहकार्याने फारुकी इनामदार येत असलेल्या जमिनीचा ताबा थांबवण्यासाठी दहा लाख रुपयांची रक्कम प्रथम जमा करा असं सांगितल्याचं सुसाईड नोट मध्ये म्हटलं.

सादिक यांनी कुटुंबीयाला देखील या सगळ्या गोष्टींची माहिती नसल्याचा सुसाईड नोटमध्ये म्हणले. माझ्यावर 24 गुन्हे दाखल केले आणि त्यामुळे माझ्यासोबत आता कोणीच राहत नाही फारुकी इनामदार जी त्यांना भीती वाटते आणि त्यांच्यावरही कोणी दाखल करण्यात येईल अशी ही त्यांना भीती वाटते त्यामुळे माझ्या जवळचे सगळे दुरावले आहेत. असे त्यांनी सुसाईड नोट मध्ये लिहिलं आहे.

आमच्या जीविताला धोका आहे त्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे असं त्याच्यामुळे सांगितलं. फारुख इनामदार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सादिक शेख यांनी आत्महत्या करताना अजित पार गटाचे उमेदवार फारुख इनामदार यांच्यानावासोबत दोन पोलीस अधिकाऱ्यांचं नाव देखील हातावर आणि सुसाइट नोटमध्ये लिहिलं आहे. मानसिंग पाटील आणि पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांचं नाव लिहिण्यात आल आहे. पोलिसांनी देखील आम्हाला त्रास दिल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आहो सुदामे! रीलस्टार अथर्व सुदामेला PMP कडून तिसरी नोटीस, 50 हजारांचा दंड

मुंबईनंतर पुण्यात तुफान राडा; शिंदे गटाच्या दोन गटाच्या २ उमेदवारांवर हल्ला, वडगाव शेरीत दगडफेक

Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर भीषण अपघात; दोन्ही कारचा चुराडा, ४ जणांचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी

Thursday Horoscope : स्वभावातला हेकेखोरपणा सोडा, नाहीतर...; ५ राशींच्या लोकांनी राहा सावधान

भाजपचा सत्तेसाठी अकोट पॅटर्न? विचारधारेला तिलांजली; AIMIM शी घरोबा, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT