Sanjay Raut- Sadabhau Khot Saam TV
मुंबई/पुणे

'आमंत्रण जेवणाचं अन् ताटात आला वडापाव'; सदाभाऊ खोतांची राऊतांना कोपरखिळी

संजय राऊतांनी आपल्या पत्रकार परिषदेमधून गंभीर आरोप केले आहेत. परंतु राऊतांची ही पत्रकार परिषद फुसका बॉम्ब असल्याची टीका विरोधी पक्षातील नेते करत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

मुंबई: विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्या कालच्या पत्रकार परिषदेवर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारची सर्कस झालेली आहे. सर्कसमधील कलाकार कशी भूमिका करत आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे. ग्रामीण भागात एक म्हण आहे आवतनं गावाला आणि वडापाव जेवयला. आमंत्रण जेवणाचे दिले आणि ताटात वडापाव दिले म्हणजे मिर्च्या खा, पाणी प्या आणि उपाशी झोपा अशी सजय राऊतांना (Sanjay Raut) पत्रकार परिषद असल्याची टीका सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली आहे. आरोपच करायचे होते तर त्यांचे सरकार आहे. त्या आरोपांची ते चौकशी करू शकले असते, शिळ्या कडीला उत आणून मूळ प्रश्नापासून लक्ष विचलित करण्याचे काम या सरकारचे सुरू असल्याचंही खोत म्हणाले.

दरम्यान संजय राऊतांनी आपल्या पत्रकार परिषदेमधून गंभीर आरोप केले आहेत. परंतु राऊतांची ही पत्रकार परिषद फुसका बॉम्ब असल्याची टीका विरोधी पक्षातील नेते करत आहेत. राऊतांनी माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते साडे-तीन लोकं कोण असा प्रश्न विचारला असता ते म्हणले की उद्यापासून कळेल. यात एक गोष्ट स्पष्ट दिसत आहे. नवाब मलिक आणि संजय राऊत या दोघांच्या लेकींना त्रास झाला आणि भाजप विरोधात त्यांनी मांड ठोकली. किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा जेलमध्ये जाईल असे राऊतांनी आज सकाळी म्हटले आहे.

नवाब मलिक भाजप विरोधात बोलतात म्हणून NCBने नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या निलोफर नावाच्या मुलीच्या नवऱ्याला अटक केली. तिला त्रास झालं त्यानंतर इनसीबी विरोधात नवाब मलिकांनी तलवार उपसलेली संबंध देशाने पाहिली आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांची मुलगी पूर्वशी हिच्या लग्नातील फुलवला, मेहंडीवला सगळीकडे एडी गेली आणि चौकशी केली. मुलांना धमकी दिली वडिलांना अटक करू असे म्हणाले त्यानंतर त्रस्त बापाने आज एडी विरोधात भूमिका मांडली असल्याचं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. दोन्ही ताकदवर नेत्यांच्या मुलींना त्रास झाला आणि बाप मैदानात उतरला असं काहीसं चित्र काल पहायला मिळाले होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab : शिवाली परब विठ्ठल नामात दंग, पाहा मनमोहक फोटो

BJP Leader: भाजप नेत्याला घेरत जीवघेणा हल्ला, भररस्त्यात संपवलं; आरोपी घटनास्थळावरुन फरार

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

SCROLL FOR NEXT