इलेक्ट्रिक बाईकची प्रवासात चार्जिंग संपली तर काय?... पठ्ठ्यानं शोधलं उत्तर

औरंगाबादच्या अफरोज शेख याने एक भन्नाट बाईक तयार केली आहे. ही बाईक इलेक्ट्रिकही आहे आणि पेट्रोलवर चालणारीही.
Aurangabad Electric Bike
Aurangabad Electric BikeSaam TV

औरंगाबाद: सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक मोटारसायकल येत आहेत. पण ती मोटारसायकल खरेदी करत असताना आपल्यासमोर प्रश्न पडतो की, मध्येच जर चार्जिंग संपली अथवा बॅटरीमध्ये काही अडचण निर्माण झाली तर काय करायचं?, पण औरंगाबादच्या (Aurangabad) एका तरुणाने याचं उत्तर शोधलंय. तर चला पाहू या औरंगाबादच्या राँचोची भन्नाट आयडिया आहे तरी काय.

औरंगाबादच्या अफरोज शेख याने एक भन्नाट बाईक तयार केली आहे. ही बाईक इलेक्ट्रिकही आहे आणि पेट्रोलवर चालणारीही. औरंगाबादच्या या पठ्याने अशी भन्नाट बाईक बनवली आहे, तेही तीन हजार रुपयात भंगारातून घेतलेल्या गाडीला 17 हजार रुपये खर्च करून. त्यामुळे आता एखाद्या वेळी जर बॅटरी संपली तर बाईक पेट्रोलवर आणि पेट्रोल संपलं तर बॅटरीवर चालू शकते. (Aurangabad Electric Bike)

Aurangabad Electric Bike
बारी बसली, शब्द पाळला! कोल्हेंनी घाटात टाकली घोडीवर मांड; पहा Video

नेमकी ही दुचाकी आहे तरी कशी- पाहुयात,

* तीन हजारात भंगारातून जुनी दुचाकी घेतली

* एकूण २० हजार खर्च करून गाडी तयार केली

* दुचाकी तयार करण्यासाठी तीन महिने लागले

* तीन तास चार्ज केल्यानंतर ही दुचाकी २० किलोमीटर चालते

* पेट्रोलवर ही दुचाकी ४५ ते ५० किलोमीटरचा पळते.

* चार्जिंग संपल्यावर सुद्धा दुचाकी पेट्रोलवर चालते

ही टेक्नॉलॉजी वापरून आपण महिंद्रा, बजाज, टीव्हीएस, होंडा, या कोणत्याही प्रकारच्या गाड्यांमध्ये हे आपण टेक्नॉलॉजी युज करू शकतो. ज्या पंधरा वर्षानंतर गाड्या स्क्राप होत आहेत त्यांच्या जर चेसीस वगैरे सगळं सामान यूज केलं तर ते इलेक्ट्रिक बाईकची किंमत आपण ५० टक्के पर्यंत आपण कमी करू शकतो.

बाजारात सध्या पेट्रोल किंवा इलेक्ट्रिक असे वेगवेगळे ऑप्शन्स असल्या बाईक्स आहेत. पण पेट्रोल आणि इलेक्ट्रिक अशी एकत्रित बाईक मिळाली तर उत्तमचं. सद्या बाजारात अनेक इलेक्ट्रिक बाईक आल्या आहेत, पण अशा बाईकची चार्जिंग संपली किंवा बॅटरीमध्ये अडचण आली तर दुचाकी बंद पडते, पण अफरोजने तयार केलेली ही भन्नाट बाईकची चार्जिंग संपली किंवा बॅटरी बंद पडली तरीही चिंता करायची गरज नाही, कारण तुम्ही पेट्रोलवर गाडी चालू शकतात, त्यामुळे आता अफरोजच्या या जुगडाचं कौतुक होत आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com