स्वतंत्र बुद्धी ही RSS च्या विचारधारेसाठी घातक - सचिन सावंत Saam TV
मुंबई/पुणे

स्वतंत्र बुद्धी ही RSS च्या विचारधारेसाठी घातक - सचिन सावंत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणीक -

मुंबई : भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सुधारित विद्यापीठ विधेयकात एलजीबीटीक्यू (LGBTQ) समुहाच्या प्रतिनिधींनाही सदस्य म्हणून नियुक्त करण्याच्या तरतुदीला विरोध केला असून समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना तुम्ही सदस्य नियुक्त करणार का? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. दरम्यान त्यांनी यावेळी त्यांनी वादर्गस्त वक्तव्य केलं आहे.

ते म्हणाले, 'अलैंगिक व्यक्ती म्हणजे जनावरांसोबत लैंगिक संबंध ठेवणारा' त्यांच्या याच वक्तव्यावरुन नवा वाद सुरु झाला असून काँग्रेस नेते सचिन सावंत (Congress Leader Sachin Sawant) यांनी त्याबाबत ट्विट केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये मुनगंटीवार यांच्यासह राष्ट्रीय स्वयंमसेवक संघावरती (RSS) निशाना साधला आहे. 'बुध्दीमत्ता व लैंगिकता यांचा काहीही संबंध नाही. मात्र हे देशाला बुरसटलेल्या विचारांच्या अंध:कारात घेऊन जाऊ पाहणाऱ्या संघाच्या लोकांना समजणार नाही कारण स्वतंत्र बुद्धी ही संघ विचारधारेसाठी घातक आहे. जगात प्रचंड सकारात्मक व प्रगतीशील बदल घडवणारे अनेक वैज्ञानिक,विचारवंत,चित्रकार हे समलैंगिक होते असं म्हणत त्यांनी त्यांनी काही समलैंगिकांची नावं देखील दिली आहेत.

फ्लॉरेन्स नाईटिंगेल,लिओनार्दो दि विंची, संगणकाचा पाया घातला ते अॅलन ट्युरिंग, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टिमचा निर्माता जॉन हॉल इ. अनेक! मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या माहितीसाठी यादी देत आहे. यापैकी कोणीही सदस्य नव्हे तर कुलगुरू म्हणून काम केले असते तर भारतीय विद्यापीठे जगात प्रथम क्रमांकावर असती असही त्यांनी ट्विट मध्ये लिहलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana News : दारूबंदी, अवैध धंद्याच्या विरोधात महिलांचा एल्गार; पोलीस स्टेशनला संतप्त महिलांची धडक

Maharashtra News Live Updates : जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने थकवा

Bigg Boss Marathi च्या घरातील सर्वाधिक गाजलेली जोडी कोणती?

UPSC चा आणखी एक घोटाळा, मुख्य परीक्षेचा पेपर फुटला, विद्यार्थ्यांचा गंभीर आरोप!

Breaking News Live : नौदल दिनानिमित्त कार्यक्रमात PM नरेंद्र मोदींनी केल्या मोठ्या घोषणा

SCROLL FOR NEXT