मुंबई: मनसेच्या (MNS) पाडवा मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thaackeray) यांनी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांवर टीकास्त्र सोडले. या मेळाव्यात त्यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित करुन या सरकारला भोंगे खाली उतरायाला लावणार असल्याचा इशारा दिला होता. तसेच जिथे जिथे भोंगे वाजतील तिथे स्पीकरवर हनुमान चालीसा लावणार असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर काल रविवारी मनसे सैनिकांनी घाटकोपर येथे स्पीकरवर हनुमान चालीसा लावली होती. यावर आता काँग्रेसचे सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी टीका केली आहे.
इडीची (ED) नोटीस आल्यावर हनुमान चालीसा आठवली हे स्पष्ट आहे. पण हनुमान चालीसा का? भीमरुपी महारुद्रा" मारुती स्तोत्र का नको? भाजपचा आदेश जसाच्या तसा मानला वाटते! अस ट्विट सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केलं आहे.
मनसेच्या (MNS) पाडवा मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदावरुन शिवसेनेवर टीका केली. यावेळी त्यांनी मशिदींवरील भोंग्यावरुन सरकारवर टीका केली. "ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर दुप्पट आवाजात स्पीकर लावायचे आणि हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, धर्माभिमानी आहे. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशांत दिसतात का? असही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांना ईडीची (ED) नोटीस आल्यानंतर हनुमान चालीसा आठवली आहे. पण यात हनुमान चालीसा का भीमरुपी महारुद्रा" मारुती स्तोत्र का नको? असा सवाल केला आहे. राज ठाकरे यांनी भाजपचा (BJP) आदेश जसाच्या तसा मानला वाटते असा टोला सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी लगावला आहे.
Edited By- Santosh Kanmuse
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.