- सचिन सावंत - Saam Tv
मुंबई/पुणे

नीती आयोग अनीतिमान शंखासूर भाजपला समज देईल? सचिन सावंतांचा सवाल

नीती आयोग अनीतिमान शंखासूर भाजपाला समज कधी देणार?, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे

साम टिव्ही

(रश्मी पुराणिक, साम ब्युरो चीफ, मुंबई)

मुंबई : केंद्र सरकारच्या Central Government इशाऱ्यानुसार महाराष्ट्रात Maharashtra कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत Corona Third Wave ६० लाख रुग्ण येण्याची शक्यता आहे. नीती आयोगानेही तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असतानाही सत्तेच्या हव्यासापोटी आंधळ्या भाजपाला BJP पुन्हा मंदिरांचे राजकारण करायचे आहे. नीती आयोग अनीतिमान शंखासूर भाजपाला समज कधी देणार?, असा सवाल काँग्रेसचे Cogress प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. Congress Leader Sachin Sawant questions BJP's Demands

भाजपचे नेते मंदीरे उघडण्याबाबत व दहिहंडी आयोजित करण्याबाबत आग्रही आहेत. याच दरम्यान भाजपने जनआशिर्वाद यात्राही काढली आहे. त्यावरुन भाजप विरोधक टीका करत आहेत.

'जन आशिर्वाद यात्रेत कोरोना नियमांच्या उल्लंघनाबाबत इतके गुन्हे दाखल होऊनही भाजपाचे डोके ठिकाणावर आलें नाही. दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढण्यासाठी भाजपाचे बंगालमधील सत्तेचे राजकारण कारणीभूत ठरले. आता तिसरी लाट लवकर आणण्यासाठी मंदिरे उघडणे व दहिहंडी आयोजनाचा हट्ट करत आहेत,' असे सावंत यांनी ट्वीटरच्या माध्यमातून म्हटले आहे.Congress Leader Sachin Sawant questions BJP's Demands

आणखी एका ट्वीटमध्ये सावंत म्हणतात... कालच केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रात उत्सवावर निर्बंध घालावेत असा निर्देश दिला आहे. सुपरस्प्रेडर भाजपा स्वार्थी राजकारणाकरिता जनतेचा जीव धोक्यात घालत आहे. भाजपा नेत्यांनी ऐकले नाही व नियमांचे उल्लंघन केले तर पोलिसांनी मुसक्या आवळाव्यात. कुठलीही दया दाखवू नये!

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru Margi 2025: बृहस्पती 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; सुख-समृद्धीसह-धनसंपत्तीही वाढणार

Maharashtra Politics: EVM विरोधात लढण्याचा पवारांचा निर्धार! आंदोलन उभारण्याचा ठाकरेंचा इशारा

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

SCROLL FOR NEXT