Thackeray Group Criticized On Shinde Sarkar Over Worli Hit And Run saam tv
मुंबई/पुणे

Saamana Editorial: केवळ गुन्हेगारांसाठी काम करणारं सरकार, लाडक्या बहिणीची भररस्त्यात हत्या; वरळी ‘हिट अॅण्ड रन’वरून ठाकरे गट आक्रमक

Thackeray Group Criticized On Shinde Sarkar Over Worli Hit And Run: ठाकरे गट वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणावरून चांगलाच आक्रमक झाल्याचं दिसत आहे. सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखामधून सरकारवर टीका केली आहे.

Rohini Gudaghe

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिट अॅण्ड रनच्या घटना वाढल्या आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे सरकार या घटनांतील आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सामना अग्रलेखातून केलाय. यावरून आता ठाकरे गटाने शिंदे सरकारवर निशाणा साधलाय. वरळीत देखील ‘हिट अॅण्ड रन’ची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेने माणुसकी चिरडून मेल्याची टीका सामना अग्रलेखामधून केली गेलीय.

लाडक्या बहिणीची भररस्यात हत्या

आरोपीला वाचवण्यासाठी प्रकरण मॅनेज केला जातंय, असा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केलाय. मात्र याप्रकरणाचा जाब विचारण्याची हिंमत कुणाला दिसत नसल्याची परखड टीका ठाकरे गटातील (Saamana Editorial) नेत्यांनी केलीय. आरोपी मिहीर शहाचा गुन्हा सदोष मनुष्यवधाचा असल्याचं म्हटलंय. तर पोलिसांनी आरोपीच्या फाशीची मागणी न्यायालयात केली तरच लाडक्या बहिणीला न्याय मिळेल, असा टोला देखील सामनामधून लगावला गेला (Worli Hit And Run) आहे.

ठाकरे गट आक्रमक

राजकीय फायद्यासाठी मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण’ योजनेचे ढोल वाजवीत आहेत. पण त्यांच्याच गटातील लाडक्या बहिणीची हत्या (Thackeray Group Criticized On Shinde Sarkar) केलीय. गुन्हेगारांनी गुन्हेगारांना वाचविण्यासाठी चालविलेलं सरकार असल्याची टीका ठाकरे गटाने केलीय. गुन्हेगार निर्धास्त झालेत, त्यांना कायद्याची भीती उरली नाही. तर पोलीस अधिकारी फक्त गणवेश घालण्यापुरतेच असल्याचं देखील सामना अग्रलेखामध्ये म्हटलंय.

वरळी ‘हिट अॅण्ड रन’

वरळी ‘हिट अॅण्ड रन’ गुन्ह्यातील आरोपीला मुंबई पोलिसांनी तीन दिवसांनंतर अटक केली. आरोपीने निरपराध महिलेची भररस्त्यावर हत्या केलीय.आरोपीचा बाप थेट मुख्यममंत्र्यांच्या गटातील हस्तक असल्यामुळे त्याचं राजकीय वजन (Maharashtra Politics) आहे. त्यामुळे पोलिसांवर मोठा दबाव असायलाच हवा, असा टोला देखील ठाकरे गटाने लगावला. गुन्हा स्पष्ट असताना या व्यक्तीला पक्षातून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जवळपास ६० तास घेतले. हे सरकार केवळ श्रीमंत आणि गुन्हेगारांसाठीच काम करत असल्याची टीका सामनामधून ठाकरे गटाने विरोधकांवर केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT