Saamana Editorial on BJP and Shinde Group Clash Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics नरभक्षक हत्ती पिसाळलेल्या वाघापेक्षा भयंकर, शिवसेना-भाजपच्या नाराजीनाट्यावर सामनातून बोचरी टीका

BJP and Shinde Group Clash: बेडूक कितीही फुगला तरी त्यास हत्ती होता येणार नाही, अशी जहरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.

Satish Daud

Saamana Editorial on BJP and Shinde Group Clash: जाहिरातीवरुन शिंदे गट आणि भाजपमध्ये निर्माण झालेला वाद आता शांत झाल्याचं दिसून येत आहे. भाजप आणि शिवसेनेत काही मतभेद होते, पण आता ते राहिलेले नाहीत, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी सांगितलं. याशिवाय शिंदे-फडणवीस यांनी एकाच मंचावर येऊन नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. अशातच ठाकरे गटाचे मुखपत्र सामना अग्रलेखातून या संपूर्ण वादावर भाष्य करण्यात आलं. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे डबक्यातील बेडूक असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हत्ती आहेत. त्यामुळे बेडूक कितीही फुगला तरी त्यास हत्ती होता येणार नाही. नरभक्षक हत्ती पिसाळलेल्या वाघापेक्षा भयंकर असतो, अशी बोचरी टीका सामनातून शिवसेना-भाजपच्या नाराजीनाट्यावर करण्यात आली आहे.

"आमच्यात काही मतभेद नाहीत, असे बावनकुळे सांगतात. त्याच वेळी देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य प्रवक्ते व शेणफेक विभागाचे प्रमुख खासदार अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले की, मुख्यमंत्री शिंदे व त्यांचे लोक म्हणजे बेडूक आहेत. बेडूक कितीही फुगला तरी त्यास हत्ती होता येणार नाही! बोंडे यांची शाळा घेणे गरजेचे आहे", असं सामना अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.

"बेडूक कितीही फुगला तरी बैल होऊ शकत नाही. पण मालकांना बैल कसे म्हणावे? म्हणून बैलाच्या जागी हत्ती आणला व त्यात काही चुकीचे नाही. म्हणजे श्री. फडणवीस हे वैभवशाली हत्ती तर मुख्यमंत्री शिंदे हे डबक्यातले बेडूक आहेत. फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रवक्त्याने शिंदे यांना बेडूक वगैरे म्हटले तरी बेडकांची चाळीस पिले तोंडातून अक्षर काढायला तयार नाहीत. सगळे कसे चिडीचूप", असा टोला सामनातून लगावण्यात आला.

"शिंदे व त्यांच्या लोकांनी महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रांत दिलेल्या जाहिरातींचे हे असे पडसाद महाराष्ट्रात उमटले. फडणवीस यांच्यापेक्षा आपणच महाराष्ट्रात लोकप्रिय असून जनतेचा कौल आपल्यालाच आहे असा ‘टेंभा’ मिरवणारी मुख्यमंत्री शिंदे यांची एक जाहिरात प्रसिद्ध होताच गोंधळ उडाला व भाजपच्या लोकांनी शिंद्यांच्या गटाला बेडूक वगैरे म्हणेपर्यंत मजल गेली", असा घणाघात देखील सामना अग्रलेखातून करण्यात आला. (Maharashtra Political News)

"गुरुवारी पालघर येथील एका सरकारी कार्यक्रमातही ‘कानदुखी पार्ट – 2’चा भाग पाहायला मिळाला. पालघर येथे पोहोचल्यावर कार्यक्रमाच्या ठिकाणी जाताना आपल्या गाडीत बसण्याचा मुख्यमंत्र्यांचा आग्रह फडणवीस यांनी धुडकावून लावला. कधीकाळी याच मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे चालक बनलेले फडणवीस अशी छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. पालघरमध्ये मात्र ते स्वतंत्र गाडीतून गेले. याचा अर्थ काय? ‘कानदुखी ते गाडीदुखी’ असा हा प्रवास आहे आणि भाजप-मिंधे सरकारची गाडी रुळावरून घसरत आहे", असं देखील सामना अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार? तारीख काय? जाणून घ्या

Horoscope Today : शिव उपासना फलदायी ठरेल, तर कोणाला मिळेल नवी दिशा आणि नवीन मार्ग; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today: तूळ, कुंभ, मिथुन राशींच्या लोकांसाठी लकी दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली, थंडीचा कडाका जाणवणार; पंखे, कुलर, एसी बंद

Maharashtra Politics : भाजपला का हवेत फडणवीसच? संघही अनुकूल, आमदारांचाही पाठिंबा

SCROLL FOR NEXT