Sharad Pawar and Gulabrao Patil News
Sharad Pawar and Gulabrao Patil NewsSaam TV

Maharashtra Politics: शरद पवार, मंत्री गुलाबराव पाटलांचा एकाच रेल्वे डब्यातून प्रवास; राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

Sharad Pawar and Gulabrao Patil News: शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार या दोन्ही नेत्यांनी एकाच रेल्वेडब्यातून प्रवास केला आहे.
Published on

Sharad Pawar and Gulabrao Patil News: देशात मोदी आणि राज्यात शिंदे या जाहिरातीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिंदे गटाचे नेते भाजपला डिवचण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर भाजपकडून सुद्धा शिंदे गटाला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. असे असताना आता शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार या दोन्ही नेत्यांनी एकाच रेल्वेडब्यातून प्रवास केला आहे. दोन्ही नेत्यांना एकत्र पाहून राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. (Latest Marathi News)

Sharad Pawar and Gulabrao Patil News
Cyclone Biparjoy: बिपरजॉय चक्रीवादळाचा कहर; गुजरातमध्ये 22 जण जखमी, 23 जनावरांचा मृत्यू, 940 गाव अंधारात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरूवारी रेल्वेच्या डब्यातून एकत्र प्रवास केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. या दोन्ही नेत्यांचे प्रवास करतानाचे फोटो देखील समोर आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे १६ जूनच्या दिवशी जळगाव (Jalgaon) जिल्हा दौऱ्यावर आहेत. अमळनेर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबीर आणि कार्यशाळेचे उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते केलं जाणार आहे.

गुरुवारी शरद पवार हे मुंबईहून रेल्वे गाडीत बसले. त्याच डब्यात शिंदे गटाचे नेते आणि जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटीलही होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही महत्वांच्या विषयावर चर्चा झाल्याचं कळतं आहे. (Maharashtra Political News)

Sharad Pawar and Gulabrao Patil News
Mumbai News: धर्माची भिंत तोडून माणुसकी जिंकली! ऑटो चालकाने वाचवले पेटलेल्या महिलेचे प्राण

दरम्यान, शरद पवार यांच्यासोबत एकाच डब्यातून प्रवास केल्यानंतर गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. आज योगायोगाने शरद पवार यांच्यासह प्रवास करण्याची संधी मिळाली. पाणी टंचाई, कृषी समस्या आणि इतर विषयांवर चर्चा झाली. त्यांनी समस्या जाणून घेतल्या, आनंद वाटला, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

त्याचबरोबर आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. शरद पवार हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. तसंच एका राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत. ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचं आपण ऐकलं पाहिजे, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी दोघांमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगितलं.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com